बारामतीकरांनो, वाहने नीट लावा, अन्यथा जबर दंड भरा

मिलिंद संगई
Tuesday, 9 June 2020

बारामती शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी, या दृष्टीने वाहतूक शाखेच्या वतीने बुधवारपासून (ता. 10) नव्या पध्दतीने कारवाई होणार आहे. या मध्ये जबर दंडाची तरतूद असल्याने नागरिकांनी चुकीच्या ठिकाणी पार्किंग केल्यास त्याचा मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. 

बारामती (पुणे) : बारामती शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी, या दृष्टीने वाहतूक शाखेच्या वतीने बुधवारपासून (ता. 10) नव्या पध्दतीने कारवाई होणार आहे. या मध्ये जबर दंडाची तरतूद असल्याने नागरिकांनी चुकीच्या ठिकाणी पार्किंग केल्यास त्याचा मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. 

कोरोनाच्या संकटातही सुरू आहे चमकोगिरी

याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी आज माहिती दिली की, चुकीच्या ठिकाणी पार्किंग केल्यास व रस्त्यावर अडथळा होईल, अशा प्रकारे वाहने लावले असता त्यांच्यावर खटला दाखल करण्यात येणार आहे. असा खटला दाखल झाल्यानंतर सदर गाडीवर खटला दाखल केल्याचे स्टिकर चिटकवले जाईल. यासाठी स्टीकरवर दिलेल्या माहितीवरून संबंधित वाहन मालकास त्याच्यावर खटला भरला असल्याचे समजेल.

सदर खटल्यामध्ये झालेला दंड व मोटार वाहन कायद्याचे कलम वेबसाईटचे नाव इत्यादी सर्व माहिती सदर वाहन रजिस्ट्रेशन करताना आरटीओ कार्यालयाकडे जो मोबाईल नंबर दिलेला असेल त्यावर जाणार आहे. तसेच सदर वेबसाईटची माहितीही या स्टिकर वर दिलेली असेल.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दंड 30 दिवसात ऑनलाइन भरला नाही, तर सदर वाहन चालका विरोधात कोर्टामध्ये खटला पाठवला जाणार आहे. या मध्ये वाहतूक पोलिसाशी चर्चा किंवा इतर काही बाबींना वावच नसेल, त्यामुळे वाहनचालकांनी आपले वाहन वाहतुकीला अडथळा होईल, असे लावल्यास त्यांना जबर दंड भरावा लागणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baramati- put the vehicles properly otherwise pay heavy fines