Baramati : हैप्पी स्ट्रीट्स उपक्रमाला उदंड प्रतिसाद, अजितदादांनी धनुष्य हातात घेऊन धरला नेम

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील या उपक्रमाच्या उद्घाटनानंतर प्रत्येक खेळाच्या ठिकाणी जाऊन बारकाईने माहिती घेतली.
Baramati
Baramati sakal
Updated on

Baramati - कोणी सापशिडी खेळतोय, तर कोणी गोट्या, कोणी लुडो खेळाचा आनंद लुटत आहे, तर कोणी धनुष्यबाण चालविण्याचा आनंद घेत होते, कोणी दोरीवरच्या उड्या मारत होते.काही जण आरोग्याच्या टिप्स घेत होते.. तर काही वडापाव भज्यांवर ताव मारत होते. बहुसंख्या लोक संगीताच्या तालावर मनसोक्त नृत्य करीत होते.

Baramati
Pune: किल्ले राजगडच्या पायथ्याशी आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह

एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने रविवारी (ता.18) बारामतीत आयोजित हॅपी स्ट्रीटस या उपक्रमाला बारामतीकारांनी अक्षरशः उदंड प्रतिसाद दिला. सकाळी सहा वाजल्यापासून पुढे तीन तास आबालवृध्दांनी आपले वय व हुद्दा विसरून अनेक खेळांचा आनंद लुटला. लहान मुलांसोबतच मोठ्यांनी देखील हॅपी स्ट्रीट अंतर्गत आयोजित विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत रविवारची सकाळ अविस्मरणीय केली.

Baramati
Mumbai News : लोकल ट्रेन रुळावरून घसरली! कल्याण-कर्जत दिशेकडे जाणारी सेवा विस्कळीत

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील या उपक्रमाच्या उद्घाटनानंतर प्रत्येक खेळाच्या ठिकाणी जाऊन बारकाईने माहिती घेतली. एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने बारामतीत सुरू असलेले काम हे प्रशंसनीय असून या पुढील काळात फोरमच्या माध्यमातून अधिकाधिक युवकांना सहभागी करून घ्यावे आणि या कामाची व्याप्ती अधिक वाढवावी, अशी सूचना अजित पवार यांनी केली.

बारामती शहर सर्वांग सुंदर करताना नागरिकांना खऱ्या अर्थाने त्याचा आनंद घेता आला पाहिजे हा उद्देश या उपक्रमाच्या माध्यमातून सफल झाला असे अजित पवार म्हणाले. वारली पेंटिंग, स्केचिंग, टॅटू काढणे, फेस पेंटिंग, पोट्रेट काढणे याचाही नागरिकांनी आनंद लुटला. या ठिकाणी बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने आरोग्याच्या टिप्स देण्यात आल्या तर योग प्रशिक्षकांनी योगाचे महत्त्व नागरिकांना समजून सांगितले.

नितिन दोशी, नंदू व सरिता डेव्हीड, आकाश जाधव, जॉनी नवगिरे, अनिल केसकर, सचिन सस्ते, गणेश हिंगणे, अँड. प्रभाकर बर्डे, डॉ. रेवती संत, सिध्दी पवार, सागर गोरे यांनी जुनी नवीन लाईव्ह गाणी सादर केली. या उपक्रमाचा शेवट झुंबा नृत्याने झाला. या नृत्यांमध्ये सर्वच वयोगटातील स्त्री पुरुष मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. त्यांनी दीड दोन तास विविध गाण्यांवर ठेका धरत या नृत्याचा मनसोक्त आनंद घेतला.

Baramati
Mumbai Crime : पत्नी शिडीवरुन पडल्याचा बनाव; पतीनेच केली गळा आवळून हत्या

विद्या कॉर्नर ते गदिमा हा रस्ता अजित पवार यांनी सुशोभित केल्यानंतर या रस्त्याच्या माध्यमातून बारामतीकरांना विविध खेळांच्या माध्यमातून वेगळा आनंद मिळावा या उद्देशाने हॅपी स्ट्रीटस या उपक्रमाचे आयोजन केल्याचे फोरमच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

मोकळ्या हवेत सकाळच्या वेळेस, नागरिकांनी मन प्रसन्न होणारे खेळ खेळावेत व नृत्याचा आनंद घ्यावा, त्यांना चार घटका विरंगुळा मिळावा, अशी या मागची संकल्पना असल्याचे सुनेत्रा पवार म्हणाल्या. बारामतीकरांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल त्यांनी बारामतीकरांचे आभार व्यक्त केले.

अजित पवारांनीही धरला नेम...

यामध्ये धनुष्यबाण हातात घेत लक्ष्याचा वेध घेण्याचाही एक क्रीडा प्रकार होता. अजित पवार यांनीही आहात धनुष्यबाण घेत लक्ष्याचा अचूक वेध घेतल्यावर उपस्थितांनीही टाळ्यांचा कडकडाट केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.