Police
Policesakal

Baramati : अपघातांची संख्या कमी करण्यासाठी बारामती आरटीओने पावले उचलली...

वाहतूक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, यासारख्या अपघातांना कारणीभूत
Published on

बारामती : रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांनी याबाबत माहिती दिली. यासंदर्भात बारामती उपप्रादेशिक कार्यालयाच्या हद्दीतील पोलीस ठाण्यात सहा मोटार वाहन निरीक्षकांची तालुका निहाय नेमणूक करण्यात आलेली आहे.

दररोज सकाळी पाच ते दहा व संध्याकाळी सहा ते रात्री दहा या वेळामध्ये सीट बेल्ट, व हेल्मेटचा वापर न करणे, सुस्थितीत नसलेले वाहन रस्त्यावर आणणे, विनापरवाना वाहन चालविणे, वाहतूक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, यासारख्या अपघातांना कारणीभूत ठरू शकणाऱ्या चुकांवर नागरिकांचे प्रबोधन करून त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामध्ये काही वाहनांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे.

बारामती, दौंड, इंदापूर तसेच पुणे सोलापूर महामार्ग, यवत अशा ठिकाणीही कारवाई करण्यात आली. बारामती एमआयडीसी मधील कंपनीतील सुरक्षा अधिकाऱ्यांची भेट घेऊन कंपनीतील कर्मचाऱ्यांचे प्रबोधन करण्याचा सूचना देण्यात आल्या. दरम्यान दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले तर किती रकमेचा दंड होऊ शकतो याबाबतचे पत्रही देण्यात आले आहे.

बारामती शहरातील शैक्षणिक संस्थांमध्ये वाहतूक नियमावलीचे पुस्तक देऊन पत्रकांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थी व पालक यांना माहिती देऊन त्यांचे प्रबोधन करण्यासोबतच दंडात्मक कारवाईबाबतची ही माहिती देण्यात आली. अल्पवयीन शालेय विद्यार्थ्यांनी वाहन चालवल्यास त्यांच्या पालकांना होणारी शिक्षा व दंड याबाबतही मार्गदर्शन केले गेले.

राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस व्यतिरिक्त प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या काळात एवढ्या जीप वर कारवाई करून त्यांनाही नियमानुसार प्रवाशांची वाहतूक करण्याबाबत प्रबोधन करण्यात आले आहे.

मोटार वाहन निरीक्षक हेमंत कुमार सोलनकर, हेमलता तावरे, धैर्यशील लोंढे, ऋषिकेश हंगे, विशाल पाटील, विठ्ठल गावडे व महादेव तनपुरे यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

साखर कारखान्यांच्या संचालकांदरम्यान प्रबोधन दरम्यान आरटीओ अधिकाऱ्यांनी ट्रॅक्टर द्वारे ऊस वाहतूक करणाऱ्या चालक-मालक यांचे प्रबोधन केले. रिफ्लेक्टर लावल्याशिवाय ट्रॅक्टर रस्त्यावर आणू नये, तसेच मोठ्या आवाजात गाणी लावून ट्रॅक्टर चालवू नये याबाबत संबंधितांना समज देण्यात आली.

Police
Pune: “आम्ही पवार महाराष्ट्राला लागलेली कीड?” माजी सैनिकाच्या मुलाचा पडळकरांना सवाल; बॅनर व्हायरल

सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर रात्री चालणाऱ्या बसेसची तपासणी करून बसच्या आपत्कालीन मार्गात अडचण आणणारे प्रवासी सीट बसविण्यात आलेल्या 22 प्रवासी बसेस वर दंडात्मक कारवाई करण्यात आली. बारामतीच्या वायु वेग पथकाने 849 वाहनांवर कारवाई करत त्यांच्याकडून 58 लाख 50 हजार रुपयांचा दंड वसूल केला.

Police
Baramati News : पिरामल फायनान्समध्ये विद्या प्रतिष्ठानच्या 54 विद्यार्थ्यांना नोकरी

यामध्ये वाहन चालवण्याचा परवाना नसताना वाहन चालविण्याच्या सर्वाधिक घटना होत्या. 186 वाहन चालकांवर कारवाई केली गेली. वाहनास रिफ्लेक्टर नसलेल्या 109 वाहनांवर कारवाई करण्यात आली. सीटबेल्ट न लावता वाहन चालवणाऱ्या 65 वाहन चालकांना कारवाई सामोरे जावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com