esakal | बारामतीत कोरोनाचा उद्रेक; एकाच दिवशी 38 रुग्ण पॉझिटीव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

In Baramati on the same day 38 patients corona positive

काल बारामतीमध्ये एकूण 69 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 60 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून नऊ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. प्राप्त झालेल्या अहवालापैकी  बारामती शहरातील नऊ व ग्रामीण भागातील 6 असे 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 44 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला.

बारामतीत कोरोनाचा उद्रेक; एकाच दिवशी 38 रुग्ण पॉझिटीव्ह

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : कोरोनाच्या रुग्णांच्या आकडयाने आज बारामतीकरांची झोप उडवली. कालपासून आज सकाळपर्यंत एकाच दिवसात तब्बल 38 रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने बारामतीकर चिंतेत आहेत. कोरोना रुग्णांचे दिवसागणिक वाढत जाणारे प्रमाण पाहता लोकांनी परिपूर्ण काळजी घेण्याची गरज प्रशासनाने बोलून दाखवली आहे. बारामतीच्या कोरोना रुग्णांच्या संख्येची झेप आता चारशेच्या टप्प्याच्या दिशेने वेगाने सुरु आहे. बारामतीत 385 जण कोरोनाग्रस्त झाले आहेत. दरम्यान कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 23 वर गेली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काल बारामतीमध्ये एकूण 69 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते, त्यापैकी 60 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून नऊ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. प्राप्त झालेल्या अहवालापैकी बारामती शहरातील नऊ व ग्रामीण भागातील 6 असे 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 44 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये टी सी कॉलेजनजिक,  कल्याणी नगर तांदूळवाडी, देसाई इस्टेट, तांबे नगर, कसबा असे शहरातील नऊ व मेडद, माळेगाव, जळगाव क प, ढेकळवाडी येथील असे पंधरा रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

बारामती येथील खाजगी प्रयोगशाळेमध्ये एकूण 88 अॅंटीजेन तपासणी करण्यात आल्या होत्या, त्यामध्ये बारामती तालुक्यातील 23 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये बारामती शहरातील 12 व ग्रामीण भागातील अकरा अशा रुग्णांचा समावेश आहे, त्यामुळे काल दिवसभरात एकूण 15 आरटीपीसीआर व 23 अॅंटीजेन असे एकूण 38 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत त्यामुळे बारामतीतील रुग्ण संख्या 385 झाली आहे.

Breaking : धोनीसोबत सुरेश रैनाचीही निवृत्तीची घोषणा​

 नागरिकांसाठी प्रशासनाचे आवाहन

''बारामतीमध्ये वाढती रुग्णसंख्या पाहता नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व सॅनिटायझरचा व मास्कचा वापर करावा तसेच ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडू नये, घरातील तरुणांनी घरात आल्यानंतर सुद्धा ज्येष्ठ नागरिकांपासून अंतर ठेवून राहावे,  ज्य़ेष्ठ नागरिकांचा कोरोनापासून बचाव करता येणे शक्य होईल.''
- डॉ. मनोज खोमणे, तालुका आरोग्य अधिकारी, बारामती. 

'माही जैसा कोई नहीं!'​