Breaking:धोनीसोबत सुरेश रैनाचीही निवृत्तीची घोषणा 

टीम ई-सकाळ
Saturday, 15 August 2020

आयपीएलसाठी चेन्नईला उड्डाण केलेल्या महेंद्रसिंह धोनीने इन्सटाग्रामवरून आपल्या निवृत्तीची घोषणा केली

मुंबई : सौरभ गांगुलीनंतर भारतीय क्रिकेटला नवी उंची देणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने आज, स्वातंत्र्यादिनादिवशी निवृत्ती जाहीर करून, चाहत्यांना धक्का दिला. आयपीएलसाठी चेन्नईला उड्डाण केलेल्या धोनीने इन्सटाग्रामवरून आपल्या निवृत्तीची घोषणा केली आणि त्यापाठोपाठ सुरेश रैनानेही निवृत्तीची घोषणा केली. सुरेश रैना आणि धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळतात. त्यांच्या मैत्रीचे किस्से कायमच क्रिकेट प्रेमींच्या चर्चेचा विषय असतो. दोघांनी मिळून, चेन्नईला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला होता. आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्सर मारणारा खेळाडू म्हणून सुरेश रैनाची ओळख होती. पण, गेल्या काही वर्षांत रैना भारतीय संघातून बाहेर राहिला होता. गेल्या वर्षी झालेल्या वर्ल्ड कपसाठीही त्याची संघात निवड झालेली नव्हती. रैनाने 2015चा वर्ल्ड कप मात्र गाजवला होता. 

आणखी वाचा - महेंद्रसिंह धोनीची निवृत्तीची घोषणा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suresh raina also announced retirement with m s dhoni