Baramati News : बारामतीत सत्यव्रत काळे व प्रियांका खारतोडे राष्ट्रवादी युवकाध्यक्षपदी

बारामती येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) युवकाध्यक्षपदी माजी नगरसेवक सत्यव्रत अर्जुनराव काळे यांची तर बारामती शहर राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी प्रियांका नितीन खारतोडे यांची निवड.
satyavrat kale
satyavrat kalesakal

बारामती - येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) युवकाध्यक्षपदी माजी नगरसेवक सत्यव्रत अर्जुनराव काळे यांची तर बारामती शहर राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी प्रियांका नितीन खारतोडे यांची निवड करण्यात आली आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्य गोविंदबाग येथील निवासस्थानी पवार यांच्या हस्ते सत्यव्रत काळे व प्रियांका खारतोडे यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले. सत्यव्रत काळे यांनी नगरसेवकपदाच्या कार्यकाळात विविध प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले आहेत.

तालुकाध्यक्ष अँड.एस.एन. जगताप, शहराध्यक्ष अँड. संदीप गुजर या प्रसंगी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याची भूमिका घेतल्यानंतर शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी बारामतीत नव्याने पक्षबांधणीस प्रारंभ केला आहे. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटास तोडीस तोड पदाधिकारी बारामतीतून देण्याच्या दृष्टीने शरद पवार गटाने मोर्चेबांधणीस प्रारंभ केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com