Sharad Pawar : जातीयवादी शक्तींना निवडणूकीत त्यांची जागा दाखवा

बारामतीत आयोजित होलार समाजबांधवांच्या मेळाव्यात शरद पवार बोलत होते. ते म्हणाले, अनेक देशात लोकशाही असूनही संविधान मजबूत नसल्याने सरकार नीट चालत नाही.
sharad pawar
sharad pawar esakal

बारामती - मराठवाडा विद्यापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच नाव देण्याच काम आम्ही केल आहे, देशात जातीयवादी शक्ती डोक वर काढू पाहत आहेत, येत्या निवडणूकीत त्यांना त्यांची जागा दाखवा असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.

बारामतीत आयोजित होलार समाजबांधवांच्या मेळाव्यात शरद पवार बोलत होते. ते म्हणाले, अनेक देशात लोकशाही असूनही संविधान मजबूत नसल्याने सरकार नीट चालत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काळजी घेतली, त्यांनी अशी घटना लिहीली त्या मुळे देश एकसंघ राहू शकला. आज देश एकसंघ आहे याचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना द्यावे लागेल.

ज्यांच्या हातात आज देशाची सत्ता आहे, त्या लोकांकडून एका वेगळ्या दिशेने या देशाचा गाडा चालवावा, ही भावना त्यांच्या मनात आहे. देशाच्या घटनेत बदल करण्याचे स्वप्न आज भाजपचे नेतृत्व बघत आहे आणि त्या साठी ते मत मागत आहेत. घटना बदलली तर सामान्य माणसाचा अधिकारच हिरावून घेतला जाईल.

हा देश शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने चालला आहे, असे नेहमी सांगितले जाते, या सर्वांनी आपले उभे आयुष्य सामान्यांची जपणूक करण्यासाठी व्यतित केले. ही विचारधाराच संकटात येत असेल तर सर्वांना या बाबत विचार करावा लागेल. जातीयवादी शक्ती पुन्हा डोक वर काढू पाहते आहे, त्याला आवर घातला पाहिजे.

आज बारामतीकडे सगळ्या देशाच लक्ष आहे, सगळ्यांना माहिती आहे की इथला मतदार विचारी आहे, येथील जनता असा निर्णय घेईल की येथील गावगाडा योग्य रस्त्यावर आणण्यासंबंधीची कुवत ज्या व्यक्तीमध्ये आहे, अशा सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा लोकसभेत पाठवून महाराष्ट्राचा नावलौकीक वाढविण्याची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

लोकसभेतील खासदारांपैकी पहिले दोन तीन खासदार जे आहेत, ज्याची नोंद बघीतली तर बारामतीच्या खासदारांच नाव पहिल्या दोघात येते. तुमच काम करणारा, तुमचे प्रश्न मांडणारा व सुख दुःखाशी समरस होणारा उमेदवार आम्ही दिलेला असून सुप्रिया सुळे यांना विजयी करण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले. जे प्रश्न मांडलेले आहेत, ते सोडविण्याची ग्वाही त्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com