Baramati News : बारामतीत शरद पवार यांच्या उपस्थितीत 22 मार्च रोजी व्यापाऱ्यांचा मेळावा

बारामती येथील व्यापाऱ्यांच्या वतीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत 22 मार्च रोजी व्यापारी मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती बारामती मधील व्यापाऱ्यांच्या वतीने देण्यात आली.
Sharad Pawar
Sharad Pawarsakal

बारामती - येथील व्यापाऱ्यांच्या वतीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत 22 मार्च रोजी व्यापारी मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती बारामती मधील व्यापाऱ्यांच्या वतीने देण्यात आली.

काल (ता. 11) बारामतीत वकील संघटनेच्या मेळाव्यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीतील व्यापाऱ्यांनी मेळावा रद्द केल्याचे सांगून खंत व्यक्त केलीं होती.

गेल्या 50 वर्षात असे कधीही घडले नाही, केवळ बारामतीच नाही तर महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले, याची आठवण देखील पवार यांनी करून दिली होती. एखाद्याचे ऐकूनच घ्यायचे नाही ही भूमिका योग्य नसल्याचे देखील शरद पवार यांनी यावेळी नमूद केले होते.

शरद पवार यांच्या या विधानानंतर त्याचे बारामतीत आज जोरदार पडसाद उमटले. व्यापारी वर्गात देखील त्याची मोठी चर्चा झाली. त्यानंतर आज बारामतीतील व्यापाऱ्यांनी तातडीची बैठक घेऊन 22 मार्च रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा आयोजित केल्याची माहिती दिली.

दरम्यान हा मेळावा रद्द केलेला नव्हता, तर तीन दिवसात सर्व व्यापाऱ्यांपर्यंत निरोप जाणे शक्य नव्हते या मेळाव्याला व्यापाऱ्यांची पुरेशी उपस्थिती राहिली नसती त्यामुळे मेळावा नंतर घेण्याचे ठरले होते, असा खुलासा व्यापारी बांधवांनी केला. कम्युनिकेशन गॅप झाल्यामुळे गैरसमज निर्माण झाला असेही यावेळेस नमूद करण्यात आले.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बद्दल आदराचीच भावना असल्याचेही व्यापाऱ्यांनी यावेळी सांगितले. 22 मार्च रोजी संध्याकाळी सात वाजता बारामतीतील श्री महावीर भवन या ठिकाणी मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती देण्यात आली.

आज बारामतीत झालेल्या बैठकीस नरेंद्र गुजराती, सुशील सोमाणी , संभाजी किर्वे, स्वप्निल मुथा , सुरेंद्रकुमार मुथा , शैलेश साळुंखे, शब्बीर कायमखानी , प्रशांत चांदगुडे, सचिन बुधकर, माजी नगराध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांचे प्रचार प्रमुख सदाशिव सातव, माजी नगराध्यक्ष जवाहर वाघोलीकर, तसेच माजी नगरसेवक सुभाष ढोले हे देखील उपस्थित होते.

दरम्यान नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील सस्ते यांनी या घटनेचा निषेध करत दुसरा व्यापारी महासंघ स्थापन करणार असल्याचे कळविले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विषयी घेतलेला हा निर्णय चुकीचा होता व याचा आम्हीं निषेध करतो असे सुनील सस्ते यांनी नमूद केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com