Baramati News : शरद पवारांची कुस्ती स्पर्धेला उपस्थिती

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने शनिवारी (ता. 23) बारामतीत कुस्त्यांचे मैदान आयोजित केले गेले.
sharad pawar
sharad pawarsakal

बारामती - ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने शनिवारी (ता. 23) बारामतीत कुस्त्यांचे मैदान आयोजित केले गेले.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही या कुस्त्यांना हजेरी लावत उपस्थित मल्लांना दाद दिली. युगेंद्र पवार हे बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष म्हणून गेली तीन वर्षे कार्यरत आहेत. दरवर्षी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत कुस्त्यांचे मैदान आयोजित केले जाते. यंदाही या मैदानाचे आयोजन युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली केले गेले.

ज्येष्ठ नेते शरद पवार, विठ्ठल मणियार, श्रीनिवास पवार यांच्यासह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. देशभरातील अनेक नामांकित मल्ल या कुस्तीच्या मैदानात उपस्थित राहणार असल्याची माहिती युगेंद्र पवार यांनी दिली. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख व शिवराज राक्षे हेही या ठिकाणी कुस्ती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकच काय ते ठरवतील....

बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये युगेंद्र पवार हे आगामी काळात राजकारणात येणार का... असे त्यांना माध्यमांनी विचारले असता, माझ्यावर अनेक जबाबदा-या आहेत, त्यामुळे राजकारणात यायचं की नाही हे लोकच ठरवतील असे ते म्हणाले.

रोहित पवारांनी शरद पवारांच्या गटात जाण्याची भूमिका घेतली आहे, तुम्ही कोणाच्या बाजूने असे विचारले असता, मी राजकारणात नसल्यामुळे मी कोणत्या गटात हा प्रश्नच उद्भवत नाही, शरद पवार व अजित पवार हे दोन्ही आमचे कुटुंबीय आहेत त्यामुळे ते माझेच असल्याचे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही या कुस्ती स्पर्धेचे निमंत्रण दिले होते, मात्र त्यांच्यावर राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी असल्यामुळे वेळ मिळाला, तर ते उपस्थित राहतील असेही त्यांनी नमूद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com