esakal | बारामतीत एसटीने उत्पन्नवाढीसाठी शोधलाय हा मार्ग 
sakal

बोलून बातमी शोधा

st baramati

दोन महिने वाहतूक ठप्प असल्याने आता उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधण्याचा एसटीच्या व्यवस्थापनाकडून प्रयत्न सुरू होता.

बारामतीत एसटीने उत्पन्नवाढीसाठी शोधलाय हा मार्ग 

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : कोरोनाच्या संकटाने जागतिक पातळीवर सर्वांचीच गणिते बदलली. राज्यातील राज्य मार्ग परिवहन मंडळही त्याला अपवाद राहिले नाही. दोन महिने वाहतूक ठप्प असल्याने आता उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधण्याचा एसटीच्या व्यवस्थापनाकडून प्रयत्न सुरू होता. आजपासून एसटीने प्रवासी वाहतुकीसोबतच मालवाहतुकीसही प्रारंभ केला आहे. 

झोपडीतील "लक्ष्मी'पुढे कुबेराची श्रीमंती पडली फिक्की... 

पुणे जिल्ह्यात बारामतीतून एसटीचा पहिला मालवाहू टेंपो आज भिवंडीकडे रवाना झाला. बारामती हायटेक टेक्‍स्टाईल पार्कमधील कॉटनकिंग या कंपनीचे 7500 पीपीई किट आज या ट्रकमधून भिवंडीकडे रवाना झाले. दरम्यान, पुणे जिल्ह्यातून मालवाहतुकीसाठी रवाना झालेला हा पहिलाच एसटीचा ट्रक असल्याची माहिती बारामती एमआयडीसीचे आगारप्रमुख गोविंद जाधव व स्थानकप्रमुख घनश्‍याम शिंदे यांनी दिली. 

 सख्खे भाऊ शेततळ्याजवळ खेळत होते अन्‌... 

प्रवासी वाहतुकीसोबतच माल वाहतुकीतून अतिरिक्त उत्पन्न मिळावे, या उद्देशाने राज्यस्तरावर हा निर्णय झाला आहे. त्या नुसार आज बारामतीतून पहिला ट्रक रवाना झाला. दरम्यान, भिवंडीहूनही अकलूजसाठी काही माल पाठविण्याचे नियोजन केल्याने दोन्ही बाजूंकडून मालवाहतुकीचे पहिल्याच दिवशी एसटीला उत्पन्न मिळणार आहे. 

भोरमधील आणखी दोघांचे कोरोना अहवाल... 

एसटीच्या मालवाहतुकीला वेगळी विश्वासार्हता असेल व दरही माफक आहे. त्यामुळे या सेवेला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा गोविंद जाधव यांनी व्यक्त केली. या प्रसंगी कॉटनकिंग या कंपनीचे संचालक खंडू गायकवाड हेही उपस्थित होते. त्यांनीही एसटीच्या या सुविधेबद्दल समाधान व्यक्त केले.