Prithviraj Chavan : पत्रकारांची भूमिका सर्वाधिक महत्वाची

पत्रकारिता वेगाने बदलत असून बदलत्या नवीन तंत्रज्ञानाचे आव्हान पत्रकारितेसमोर आहे.
Prithviraj Chavan
Prithviraj ChavanSakal

बारामती - पत्रकारिता वेगाने बदलत असून बदलत्या नवीन तंत्रज्ञानाचे आव्हान पत्रकारितेसमोर आहे. प्रिंट मिडीयापुढे अस्तित्वाचे आव्हान असून लोकशाहीचा चौथा स्तंभ हणून पत्रकारांची भूमिका महत्वाची आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

व्हॉईस ऑफ मिडीयाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार, राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ, शिवराज पाटील, राणा सूर्यवंशी उपस्थित होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, पत्रकारांची विश्वासार्हता कायम राहणे अत्यावश्यक आहे. आज स्वतंत्र बाण्याच्या पत्रकारितेविषयी समाजात काही प्रमाणात साशंकता निर्माण होऊ पाहत आहे, व्हॉईस ऑफ मिडीया सारख्या संघटनांनी याबाबत विश्वासार्हता कशी जपता येईल असे काम करायला हवे.

खेड्याकडे चला हा मूलमंत्र जपण्याची गरज पोपटराव पवार यांनी बोलून दाखवली. शहरांवरील ताण कमी करायचा असेल तर गावाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ग्रामविकासासाठी पत्रकारांनी पुढाकार घ्या असे ते म्हणाले.

संदीप काळे यांनी या संघटनेच्या माध्यमातून उभारलेले काम महत्वाचे असून राष्ट्रीय स्तरावर पत्रकारांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी या संघटनेकडून भरीव काम होईल, असे मत गोदावरी समूहाच्या राजश्री पाटील यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी संदीप काळे यांचा विशेष सत्कार केला गेला. नियोजित गृहप्रकल्पासाठी हिंगोली, सर्वोत्कृष्ट शाखा म्हणून चंद्रपूर, संघटन बांधणीसाठी धाराशिव व वाशिम टीमला सन्मानित केले गेले.

परभणीचे गजानन देशमुख, विजय चोरडीया, मंगेश खाटिक यांचा, फिरोज पिंजारी, विनोद बोरे, अर्चना बोरे, बारामतीचे किरण गुजर, सचिन सातव, हनुमंत पाटील, विशाल बाबर, अमर चोंडे, संजील कल्पुरी, स्वप्निल शिंदे यांना सन्मानित केले गेले. पत्रकार पाल्यासाठी शैक्षणिक किट वाटप प्रारंभही याप्रसंगी झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com