बारामती- ठिय्या आंदोलनामध्ये महिलांची शासकीय वाहनांची प्रतिकात्मक पूजा

मिलिंद संगई
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

बारामती शहर - मराठा आरक्षणासाठी बारामतीत सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनामध्ये आज महिलांनी शासकीय वाहनांची प्रतिकात्मक पूजा करुन अभिनव पध्दतीने निषेध नोंदविला. ठिय्या आंदोलनाच्या आजच्या तिस-या दिवशी बारामती तालुक्याच्या विविध भागातून मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजच्या ठिय्या आंदोलन स्थळी भारुडकार शिवाजी काळे यांनी भारुड सादर केले. 

आज तालुक्यातील फलटण रस्ता परिसरातील सांगवी, शिरवली, खांडज, गवारे फाटा, मळद, बारामती ग्रामीण, पाहुणेवाडी, माळेगाव कारखाना, घोरपडे वस्ती, कांबळेश्वर, शिरष्णे, पिंपळवाडी, पंधारवाडी आदी भागातून मराठा बांधव ठिय्या आंदोलनात सहभागी झाले. 

दुपारच्या सत्रात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस वाहनांचे मराठा समाजातील महिलांनी प्रतिकात्मक पूजन करुन आरक्षण देण्यात शासनाकडून दिरंगाई होत असल्याचा निषेध नोंदविला. या वेळी आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या समाज बांधवांना श्रद्धाजली वाहण्यात आली. या वेळी छोट्या गटातील आराध्या गायकवाड हिने आरक्षण का हवे या विषयावर भाषण सादर केले. 

Web Title: In Baramati-Thiya agitation, women's symbolical worship of government vehicles