Baramati Crime News : मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याला लुटणाऱ्या तिघांना अटक

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला लुटणाऱ्या तिघांना बारामती तालुका पोलिसांनी केली अटक.
Baramati Crime News : मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याला लुटणाऱ्या तिघांना अटक
Summary

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला लुटणाऱ्या तिघांना बारामती तालुका पोलिसांनी केली अटक.

बारामती - येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या खिशातील 15 हजारांची रक्कम चोरुन नग्न फोटो काढत जबरदस्तीने एटीएम सेंटरमधून रक्कम काढून घेणाऱ्या तिघांना बारामती तालुका पोलिसांनी अटक केली.

राहूल धोंडीबा हुगाडे (वय 23, रा. पाहुणेवाडी, ता. बारामती), सुमित किशोर पवार (वय 24, रा. बांदलवाडी, ता. बारामती) आणि भूषण भास्कर रणसिंग (वय 20, रा. मार्केट यार्ड रोड, बारामती) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे व सहायक पोलिस निरीक्षक राहुल घुगे यांनी ही माहिती दिली.

रविवारी (ता. 4) ही घटना घडली होती. रविवारी हा विद्यार्थी सुभद्रा मॉलमध्ये खरेदी करत कॉलेजकडे निघाला असताना या तिघांपैकी एकाने त्याच्या खिशातील 15 हजार रुपये काढून घेतले होते. त्याचा जाब तो विचारत असताना दुसऱ्या दुचाकीवरून दोघे तेथे आले. या तिघांनी त्याला जबरदस्तीने दुचाकीवर बसवत ऊसाच्या पिकात नेले. तेथे त्याला नग्न करत त्याचे शुटींग, फोटो घेतले. ते व्हायरल करण्याची धमकी देत एटीएम केंद्रात नेत दोन ट्रान्झेक्शनद्वारे त्याच्या खात्यातून 14 हजार 500 रुपये काढण्यात आले होते. त्याला केलेल्या मारहाणीत त्याच्या हाताचे बोट फ्रॅक्चर झाले होते.

फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ हालचाली करत या प्रकरणी तिघांना अटक केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com