Baramati News : बारामतीत व्यापा-यांनी शरद पवारांचा मेळावा केला रद्द

बारामतीत आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार यांनी विविध मेळाव्यांचे आयोजन केले होते.
sharad pawar
sharad pawarEsakal

बारामती - शहरातील व्यापा-यांवर कोणाचा दबाव आहे हे माहिती नाही, व्यापारी मेळावा रद्द व्हावा ही बाब दुर्देवी असल्याचे सांगत गेल्या पन्नास वर्षात असे कधीच घडले नसल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नमूद केले.

बारामतीत आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार यांनी विविध मेळाव्यांचे आयोजन केले होते. त्यात डॉक्टर व वकीलांसमवेतच व्यापा-यांचाही मेळावा नियोजित होता. मात्र ऐनवेळेस व्यापारी वर्गाने मेळावा घेणे शक्य नसल्याचे पत्र शरद पवार यांना दिले.

बारामतीत वकीलांच्या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी ही बाब बोलून दाखवली. ते म्हणाले, बारामतीतील व्यापा-यांना नेमकी कशाची चिंता वाटते आहे हे समजत नाही. आजवर व्यापा-यांचे प्रश्न मी सोडवलेले आहेत, आज अचानकच मेळावा रद्द झाल्याचेच पत्र मला दिले गेले. गेल्या पन्नास वर्षात असे कधीच घडले नाही, त्यांना कसली तरी चिंता वाटत असावी व मेळावा न घेतलेलाच बरा असेही वाटले असावे.

व्यापारी मंडळींनी समोरच्यांचे ऐकूनच घ्यायचे नाही असे ठरवले याचा खेद वाटतो. आज बारामतीत थेट शरद पवारांचाच मेळावा रद्द करण्याचा निर्णय व्यापा-यांनी घेतल्याने व स्वताः पवार यांनीच त्याचा जाहीरपणे उल्लेख केल्याने त्याची जोरदार चर्चा होती.

दरवर्षी दिवाळीच्या पाडव्याला शरद पवार यांना बारामती व्यापारी सन्मानाने त्यांचे आगामी वर्षांचे आडाखे व बाजारपेठेची स्थिती यांची माहिती घेण्यासाठी आवर्जून बोलावत होते. राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फूटीनंतर बारामतीची राजकीय समीकरणेच बदलून गेल्याचे हे द्योतक मानले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com