काटेवाडीत वर्कशॉपमधून तांब्याच्या तारांची चोरी

काटेवाडीत वर्कशॉपमधून 
तांब्याच्या तारांची चोरी
Published on

बारामती, ता. १३ : तालुक्यातील काटेवाडी येथील ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती वर्कशॉपमधून चोरट्यांनी ८५ हजारांच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्या. याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दत्तात्रेय श्रीमंत पवार (रा. काटेवाडी, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, इंदापूर रस्त्यावरील मिरावली चौकासमोरील त्यांच्या रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) दुरुस्ती वर्कशॉपमध्ये शनिवार (ता. ९) ते रविवार (ता. १०) चोरी झाली. चोरट्यांनी वर्कशॉपच्या मागील बाजूचा पत्रा उचकटून तांब्याच्या तारांची चोरी केली.

Marathi News Esakal
www.esakal.com