श्रमदानाच्या गोंधळाला या (व्हिडिओ)

ज्ञानेश्वर रायते
गुरुवार, 10 मे 2018

थोरातवाडी शिवारात जागरण; लग्नपत्रिकेतून जनजागृती

भवानीनगर (बारामती, पुणे) : राज्यात जलसंधारणासाठी सुरू असलेल्या स्पर्धेत नाविण्यपूर्ण कल्पना राबविताना गावकरीच नव्हे, तर अनेक कुटुंबंही त्यात सामील होताना दिसत आहेत. थोरातवाडीत जागरणातला गोंधळ थेट शिवारातच घालण्यात आला, तर बुधवारी बारामतीत होणाऱ्या लग्नाच्या पत्रिकेत श्रमदानाचे आवाहन करण्यात आले आहे.

जूनपूर्वीच गावातील जलसंधारणाची कामे करण्यासाठी गावे पुढे सरसावली आहेत. या गावांना प्रोत्साहन देताना व जलसंधारणाबरोबर लोकसहभाग वाढविण्यासाठी गावाचे मनसंधारणही महत्त्वाचे आहे, हे सांगण्यासाठी नाविण्यपूर्ण कल्पना आखून स्पर्धेत काही गुण दिले आहेत. त्यासाठी गावकरीही नवनवीन गोष्टी राबवत आहोत. इंदापूर तालुक्‍यातील घोरपडवाडीत वारकऱ्यांनी अखंड हरिनाम सप्ताहातून थेट दिंडी काढून श्रमदान केलं. थोरातवाडी येथे वकील, डॉक्‍टर्स, विमा प्रतिनिधी, तलाठी, पोलिस पाटील अशांनी सहभागी होऊन श्रमदान केले. थोरातवाडीत मंगळवारी (ता. 8) जागरण गोंधळातला गोंधळ थेट शिवारात घातला. बापूराव तनपुरे यांच्या घरासमोर घालायचा गोंधळ त्यांनी शिवारात नेऊन घातला. यावेळी संबळाच्या, हलगीच्या व झांजांच्या साथीने व आराधी मंडळींच्या गाण्यांतून श्रमदात्यांनाही हुरूप चढला आणि कामाला वेग आला.

व्हिडिओतून जलसंधारणाचे आवाहन
इंदापूर तालुक्‍यातील लामजेवाडी गावातही असाच हुरुप आहे. या गावातील धुमाळ कुटुंबातील नारायण धुमाळ यांची मुलगी स्नेहा हिचा विवाह बुधवारी (ता. 9) बारामतीत झाला. तिच्या विवाहात वाजंत्री, फटाके, सत्कार यासह अनावश्‍यक खर्च टाळून धुमाळ परिवाराने पाणी फाउंडेशनच्या गावातील श्रमदानासाठी 51 हजार रुपयांची मदत केली. त्यासाठी आवाहन करणारा व्हिडिओही नियोजित वधू-वरांनी तयार केला आहे.

Web Title: baramati water shramdan and halgi