Baramati News : स्मार्ट व लोकाभिमुख पोलिसिंग करणार- संजय जाधव

बारामती येथील नवनियुक्त अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी शुक्रवारी (ता. 2) आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली.
Sanjay jadhav
Sanjay jadhavsakal
Updated on

बारामती - येथील नवनियुक्त अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी शुक्रवारी (ता. 2) आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे यांची मुंबईला पोलिस उपायुक्तपदी बदली झाली. आज भोईटे यांनी जाधव यांच्याकडे बारामतीचा कार्यभार सुपूर्द केला.

कायदा व सुव्यवस्था कायम राखणे, स्मार्ट पोलिसिंग करण्यासह गुन्हेगारी कमी करुन महिलांविषयक गुन्हे घडणार नाहीत याची काळजी आपण आपल्या कार्यकाळात घेऊ, अशी ग्वाही संजय जाधव यांनी दिली.

संजय जाधव यांनी या अगोदर चंद्रपूर व श्रीरामपूर येथे गेली बारा वर्षे अतिरिक्त पोलिस अधीक्षकपदाचा कार्यभार सांभाळला आहे. चंद्रपूर येथे कार्यरत असताना नक्षली भागात विशेष कामगिरी बजावल्याबद्दल राज्य शासनाच्या वतीने त्यांना विशेष सेवा पदक प्रदान करण्यात आले होते.

बारामती विभागातील सर्व 15 पोलिस ठाण्यांना भेटी देऊन तेथील माहिती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांशी थेट संवाद साधून लोकाभिमुख पोलिसिंग कसे करता येईल या वर आपला भर असेल, असे ते म्हणाले.

आनंद भोईटे यांनीही त्यांच्या कार्यकाळात अनेक जटील गुन्हे उघड करण्यासाठी टीमवर्कने काम केले. त्यांची कारकिर्दही गुन्हेगारी कमी करण्यासाठी महत्वपूर्ण ठरली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com