esakal | बारामतीत धक्कादायक प्रकार, महिलेचा मृतदेह 24 तास शीतगृहातच पडून
sakal

बोलून बातमी शोधा

dead_body

बारामती शहरातील एका महिलेस काल सकाळी सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयातून रुई ग्रामीण रुग्णालयात त्रास होत असल्याने हलविण्यात आले होते. सकाळी दहा वाजता दाखल झालेल्या या महिलेचा दुपारी साडेतीनच्या सुमारास मृत्यू झाला.

बारामतीत धक्कादायक प्रकार, महिलेचा मृतदेह 24 तास शीतगृहातच पडून

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : बारामती येथील रुई ग्रामीण रुग्णालयात काल दुपारी चारच्या सुमारास मृत्यू झालेल्या एका महिलेवर तब्बल 24 तास उलटूनही अंत्यसंस्कार झाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बारामती शहरातील एका महिलेस काल सकाळी सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयातून रुई ग्रामीण रुग्णालयात त्रास होत असल्याने हलविण्यात आले होते. सकाळी दहा वाजता दाखल झालेल्या या महिलेचा दुपारी साडेतीनच्या सुमारास मृत्यू झाला. अचानकच झालेल्या मृत्यूने नातेवाईकांना कमालीचा धक्का बसला होता. तीनच दिवसांपूर्वी या महिलेच्या आईचे निधन झाले होते. या धक्क्याने संबंधित महिलेला त्रास होत होता. 

आता लग्नाची सीडीही पोलिस ठाण्यात द्यावी लागणार

सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात संबंधित महिलेचा स्वॅब घेण्यात आला होता, मात्र तिला त्रास होऊ लागल्याने तिला रुई ग्रामीण रुग्णालयात दाखल केले गेले. तिच्यावर रुईला उपचारही सुरु झाले, मात्र तिचा काही तासातच मृत्यू झाला. नातेवाईकांचा मनस्ताप या मृत्यूनंतरच खऱ्या अर्थाने सुरु झाला. काल दुपारी चारच्या सुमारास मृत्यू झालेल्या संबंधित महिलेवर आज दुपारी चारपर्यंत अंत्यसंस्कारच झालेले नव्हते. तब्बल 24 तास हा मृतदेह रुई ग्रामीण रुग्णालयाच्या शीतगृहात पडून होता. या संदर्भात रुईचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील दराडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, संबंधित महिलेच्या कोरोनाच्या तपासणीचा रिपोर्ट संध्याकाळपर्यंत आला नव्हता, शिवाय नातेवाईकांची संमती मिळालेली नव्हती. त्यामुळे उशीर झाला. 

शिपायापासून अभियंत्यांपर्यंत सर्वांना मिळणार नोकरी

प्रत्यक्षात समन्वयाच्या अभावामुळेच हा प्रकार झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. काल दुपारपासून या कुटुंबियांचा सुरु असलेला मनस्ताप आज दुपारपर्यंत थांबलेला नव्हता. आज दुपारी जेव्हा माध्यमांच्या प्रतिनिधींनी या प्रकाराची चौकशी सुरु केल्यानंतर पळापळ सुरु झाली. एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा कार्यक्रम नंतर सुरु झाला होता. या संदर्भात उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनीही तातडीने लक्ष घातल्यानंतर सूत्रे फिरली.