बारामतीत सकाळ आणि जीवनविद्या फाउंडेशनतर्फे योग शिबिर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 June 2020

जीवन विद्या योग फाउंडेशनचे प्रमुख योगाचार्य डॉ. निलेश महाजन यांनी बारामतीतील मान्यवरांना योगासनांचे धडे दिले. गटशिक्षणाधिकारी संजय जाधव , ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माधव जोशी, बारामती सायकल क्लबचे प्रमुख ऍड. श्रीनिवास वायकर, रोटरी क्लबचे प्रतिक दोशी यांच्यासह अनेक मान्यवर या योग शिबिरास उपस्थित होते.

बारामती : सकाळ माध्यम समूह व जीवन विद्या योग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिनानिमित्त बारामतीत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शारीरिक अंतर राखणे, सॅनिटायझर वापर या सर्व नियमांसह हे योग शिबिर बारामतीतील चिराग गार्डन येथे संपन्न झाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जीवन विद्या योग फाउंडेशनचे प्रमुख योगाचार्य डॉ. निलेश महाजन यांनी बारामतीतील मान्यवरांना योगासनांचे धडे दिले. गटशिक्षणाधिकारी संजय जाधव , ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माधव जोशी, बारामती सायकल क्लबचे प्रमुख ऍड. श्रीनिवास वायकर, रोटरी क्लबचे प्रतिक दोशी यांच्यासह अनेक मान्यवर या योग शिबिरास उपस्थित होते.

दुबईतील दिर्हाम आले पुणेकरांच्या मदतीला; पाहा काय केलंय त्यांनी!

मंगल लॅबचे डाँ. पंकज गांधी हे या योग शिबिराचे मुख्य प्रायोजक होते चिराग गार्डन चे चंद्रवदन शहा ( मुंबईकर) व चिराग शहा( मुंबईकर), बारामती सायकल क्लब , ज्येष्ठ नागरिक संघ यांनी या शिबिरासाठी विशेष सहकार्य केले. योगासनांचे महत्त्व डॉ. नीलेश महाजन यांनी यावेळी सांगितले.

पोटातच बाळ मरण पावलेल्या महिलेसाठी अँब्यूलन्स चालक ठरला देवदूत  

सकाळचे वितरण व्यवस्थापक मनोज काकडे यांनी प्रास्ताविकात शिबिर आयोजना मागील पार्श्वभूमी विशद केली. जाहिरात व्यवस्थापक घनश्याम केळकर, मिलिंद संगई, महादेव जाधव यांनी उपस्थितांचे सत्कार केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baramati Yoga Camp by Sakal and Jeevanvidya Foundation