बारामतीत 'टेलीग्राम अ‍ॅप'वर अश्लिल मजकूर 'शेअर' करुन तरुणीची केली बदनामी

मिलिंद संगई
बुधवार, 29 जुलै 2020

संबंधित युवकाने 20 ते 27 जुलैच्या दरम्यान एका मोबाईलधारकाने टेलिग्रामवर असलेल्या पोस्टचे स्क्रिन शॉट फिर्यादीस पाठविले. त्यात एस नावाच्या टेलिग्रामवरुन वेड सर्व्हिस वेबसाईट या इंटरनेट साईटवर संशयित सागर पुडाईत याने फिर्यादीचे मोबाईल नंबर टाकून त्याखाली अत्यंत अश्लिल शब्दात काही मजकूर लिहीला.

बारामती : शहरातील एका दुकानात कार्यरत असलेल्या युवतीचा तसेच तिच्या मैत्रीणीचा मोबाईल क्रमांक सोशल मिडीयावर व्हायरल करीत त्याच्यासोबत अश्लिल मजकूर लिहित बदनामी केल्या प्रकरणी शहर पोलिसांनी एका संशयिताविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सागर संजय पुडाईत (रा. कर्जत, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. संबंधित युवकाने 20 ते 27 जुलैच्या दरम्यान एका मोबाईलधारकाने टेलिग्रामवर असलेल्या पोस्टचे स्क्रिन शॉट फिर्यादीस पाठविले. त्यात एस नावाच्या टेलिग्रामवरुन वेड सर्व्हिस वेबसाईट या इंटरनेट साईटवर संशयित सागर पुडाईत याने फिर्यादीचे मोबाईल नंबर टाकून त्याखाली अत्यंत अश्लिल शब्दात काही मजकूर लिहीला. यामुळे संबंधित युवतीस अनेक फोन येऊ लागले होते. केवळ फिर्यादीच नाही तर, तिच्या एका मैत्रीणीचाही नंबर अशाच पध्दतीने संबंधित युवकाने टेलिग्रामवरुन व्हायरल केलेला आहे. या संदर्भात दिलेल्या फिर्यादीत संबंधित युवतीने सागर संजय पुडाईत याच्यावर संशय व्यक्त केला असून या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी पुडाईत यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

''कोणत्याही युवती किंवा महिलांना अशा स्वरुपाचा त्रास होत असेल किंवा विनाकारण फोन करुन किंवा मेसेज करुन कोणी त्रास देत असेल तर त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा''', असे आवाहन पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील यांनी केले आहे. दरम्यान आपली मुले मोबाईलवरुन एखाद्या मुलीला किंवा महिलेला विनाकारण त्रास देत नाही, मेसेज किंवा सतत फोन करुन छेडछाड तर करत नाहीत ना याकडे पालकांनीही बारकाईने लक्ष ठेवावे'', असेही आवाहन करण्यात आले आहे. 

ऐकावे ते नवलच! कोरोनाने मृत्यू झालेली 'ती' झाली पुन्हा जिवंत

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Baramati a young woman was defamed by sharing an obscene text on a telegram app