
शहरातील बारामती हॉस्पिटलमागील बाजूस का युवकाकडून शहर पोलिसांनी लोखंडी गावठी बनावटीचे रिव्हॉल्व्हर जप्त केले.
बारामती : शहरातील बारामती हॉस्पिटलमागील बाजूस का युवकाकडून शहर पोलिसांनी लोखंडी गावठी बनावटीचे रिव्हॉल्व्हर जप्त केले. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर व पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी या बाबत माहिती दिली.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सहायक पोलिस निरिक्षक प्रकाश वाघमारे, सहायक फौजदार संजय जगदाळे, रुपेश साळुंके, सुहास लाटणे, दशरथ इंगवले, योगेश कुलकर्णी, तुषार चव्हाण, अकबर शेख, संदीपान माळी, अनिल सातपुते, गोपाळ ओंबासे, अनिल सातपुते, दादासाहेब डोईफोडे, अंकुश दळवी, बंडू कोठे हे गस्त घालत असताना त्यांना बारामती हॉस्पिटलच्या मागे रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रतिक भालचंद्र शिंदे (वय 25, रा. हरिकृपानगर, बारामती) हा संशयास्पद पध्दतीने वावरताना सापडला.
त्याची झडती घेतली असता त्याच्या कंबरेला पिस्तूल आढळल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या पूर्वी त्याला दोन पिस्तूल बाळगल्याप्रकरणीच अटक करण्यात आली होती व तो जामिनावर सुटला होता. पुन्हा त्याच्याकडे पिस्तूल सापडल्याने पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेतली असून तपास सुरु करण्यात आला आहे. प्रतिक शिंदे याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पुणेकरांच्या खिशाला कात्री; का होतेय पेट्रोल- डिझेलच्या भावात वाढ?
दरम्यान नारायण शिरगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी एकट्या बारामतीत पोलिसांनी वीस पिस्तूल जप्त केले होते. नवीन वर्षातील हे पहिले पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. जिल्ह्यात शस्त्रांसह वावरण्याचे प्रमाण वाढणे ही पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनीही शस्त्र शोधासाठीही पोलिसांना सूचना दिल्या आहेत.
(संपादन : सागर डी. शेलार)