बारामतीकरांनी अनुभवली ईश्वरीय संगीताची अनुभूती

बारामतीकरांनी अनुभवली ईश्वरीय संगीताची अनुभूती
बारामतीकरांनी अनुभवली ईश्वरीय संगीताची अनुभूतीsakal

बारामती : संगीतातून मिळणारा ईश्वरीय आनंद म्हणजे नेमका काय असतो याची अनुभूती रसिक बारामतीकरांनी मंगळवारी संध्याकाळी अनुभवली. सुप्रसिध्द शास्त्रीय गायक पं. वेंकटेश कुमार यांच्या स्वरांनी रसिक चिंब न्हाऊन निघाले. अतिशय सुरेलपणे त्यांनी विविध रागांचे सादरीकरण करुन लोकांच्या टाळ्या मिळविल्या.

पवार सार्वजनिक न्यासाच्या वतीने आयोजित यंदाच्या शारदोत्सवातील पहिले सादरीकरण पं. वेंकटेश कुमार यांनी केले. पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य असलेल्या पं. वेंकटेश कुमार यांच्या गायनाने बारामतीकरांची मने जिंकून घेतली.

बारामतीकरांनी अनुभवली ईश्वरीय संगीताची अनुभूती
भारत बायोटेकच्या 'कोव्हॅक्सिन'ला अखेर WHOची मान्यता - सूत्र

तुम बिन कौन या राग शुध्द कल्याणातील रचनेने त्यांनी कार्यक्रमाचा प्रारंभ केला. त्या पाठोपाठ त्यांनी राग दुर्गा जगत जननी माता भवानी या रचनेद्वारे गायला. त्या नंतर येगा येगा विठाबाई माझे पंढरीचे आई हा अभंग सादर केला. त्या नंतर कैलास वाव गौरी शरीशा ही कन्नड रचना सादर केली. आलीया संसार सुखाने करावा हा अभंग आणि त्या पाठोपाठ सुप्रसिध्द भाग्यदा लक्ष्मी बारम्मा हा कन्नड अभंग त्यांनी सादर केला. भैरवीने त्यांनी कार्यक्रमाची सांगता केली. त्यांच्या या सादरीकरणानंतर रसिकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांना अभिवादन केले. अश्विनी पवार कार्तिकेयन यांनी पं. वेंकटेश कुमार यांचा सत्कार केला.

त्यांना तबल्यावर भरत कामत, हार्मोनियमवर सुयोग कुंडलकर, तानपु-यावर बसवराज हिरेमठ व राहुल जगताप यांनी साथसंगत केली.

खासदार सुप्रिया सुळे यांनी दीड वर्षांच्या खंडानंतर पुन्हा एकदा हा कार्यक्रम सुरु झाला या बद्दल आनंद व्यक्त करत बारामतीकरांचे स्वागत केले. विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अँड. ए.व्ही. प्रभुणे यांनी पं. वेंकटेश कुमार यांचा परिचय करुन दिला. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, कृषी विकास प्रतिष्ठानच्या विश्वस्त सुनंदा पवार, रजनी इंदुलकर यांच्यासह मृणाल पवार, विद्या प्रतिष्ठानच्या सचिव अँड. नीलीमा गुजर, विश्वस्त किरण गुजर, डॉ. राजीव शहा, रजिस्ट्रार श्रीश कंभोज आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com