esakal | बारामतीचा सीसीटीव्ही प्रकल्प रेंगाळला
sakal

बोलून बातमी शोधा

CCTV

बारामती शहराच्या दृष्टीने महत्वाकांक्षी 172 सीसीटीव्ही कॅमे-यांचा प्रकल्प वर्षभर रखडला आहे. बारामतीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा प्रकल्प वेळेत कार्यान्वित होणे गरजेचे असतानाही विविध तांत्रिक बाबींसाठी हा प्रकल्प रखडल्याचे समोर येत आहे.

बारामतीचा सीसीटीव्ही प्रकल्प रेंगाळला

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती - शहराच्या दृष्टीने महत्वाकांक्षी 172 सीसीटीव्ही कॅमे-यांचा प्रकल्प वर्षभर रखडला आहे. बारामतीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा प्रकल्प वेळेत कार्यान्वित होणे गरजेचे असतानाही विविध तांत्रिक बाबींसाठी हा प्रकल्प रखडल्याचे समोर येत आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामतीतील चो-यांच प्रमाण कमी व्हावे, प्रत्येक घटनांवर पोलिसांची बारकाईने नजर राहावी या उद्देशाने शहरात 172 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची महत्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली आहे. दिवंगत खासदार डी.पी. त्रिपाठी यांनी त्यांच्या खासदारनिधीतून या साठी 75 लाखांची रक्कम देऊ केली आहे. या प्रकल्पाला राज्य शासनाने मंजूरी दिली.

'महालाभार्थी'द्वारे घेता येणार झेडपी योजनांचा घरबसल्या लाभ

हे काम अधिक परिपूर्ण व्हावे या दृष्टीने केपीएमजी या कंपनीकडून सर्वेक्षणही करुन घेण्यात आले होते. शास्त्रशुध्द पध्दतीने कॅमे-यांची रचना व्हावी व आगामी काळात वाढणारी लोकसंख्या विचारात घेऊन त्या दृष्टीने हा प्रकल्प व्हावा अशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अपेक्षा आहे. त्या नुसार संबंधित कंपनीने प्रकल्प अहवालही तयार केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 

1 कोटी 34 लाखांचा खर्च या प्रकल्पासाठी अपेक्षित होता मात्र नंतर यात काही बदल झाल्यामुळे हा खर्च वाढणार आहे, मात्र त्या साठी अजित पवार निधीची तरतूद करणार आहेत. 

निष्काळजीपणे सिझेरियन करणाऱ्या दोन डॉक्‍टरांना दहा वर्षे तुरुंगवास

 बारामती नगरपालिकेच्या संवेदनशील ठिकाणी पोलिस व नगरपालिका यांच्या समन्वयातून 172 ठिकाणी उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा हा प्रकल्प आहे. या पैकी 75 लाख त्रिपाठी यांनी दिलेले असून उर्वरित 59 लाखांची रक्कम बारामती नगरपालिका खर्च करणार असे ठरले होते.  
नगरपालिकेची हद्दवाढ झाल्यानंतर शहराचे कार्यक्षेत्र 54 स्क्वेअर कि.मी. इतके व्यापक झाले. शहराचे वेगाने नागरिकरण झाल्याने दुचाकी चोरीसह इतरही काही अनुचित घटना घडत आहेत. वाहतूकीचे समन्वयन करण्यासह इतरही बाबतीत सीसीटीव्ही शहरात असणे गरजेचे आहे.

Edited By - Prashant Patil