esakal | 'महालाभार्थी'द्वारे घेता येणार झेडपी योजनांचा घरबसल्या लाभ
sakal

बोलून बातमी शोधा

Pune-Zp

पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या केंद्र, राज्य सरकार आणि झेडपीच्या स्वनिधीतील झयोजनांच्या लाभासाठी आता गरजूंना ग्रामसेवक कार्यालय, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद मुख्यालयाचे उंबरठे झिजविण्याची गरज नाही. यासाठी तुम्ही आता घरबसल्या एका क्लिकवर अर्ज दाखल करू शकता. ही अनोखी सुविधा आपल्यासाठी पुणे जिल्हा ऐपरिषदेने उपलब्ध करून दिली आहे.

'महालाभार्थी'द्वारे घेता येणार झेडपी योजनांचा घरबसल्या लाभ

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या केंद्र, राज्य सरकार आणि झेडपीच्या स्वनिधीतील झयोजनांच्या लाभासाठी आता गरजूंना ग्रामसेवक कार्यालय, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद मुख्यालयाचे उंबरठे झिजविण्याची गरज नाही. यासाठी तुम्ही आता घरबसल्या एका क्लिकवर अर्ज दाखल करू शकता. ही अनोखी सुविधा आपल्यासाठी पुणे जिल्हा ऐपरिषदेने उपलब्ध करून दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या माध्यमातून आपल्यासाठी (लाभार्थ्यांसाठी) महालाभार्थी हे खास वेबपोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या धर्तीवर असे पोर्टल विकसित करण्यात आले आहे. अशा पद्धतीचे पोर्टल विकसित करणारी पुणे ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरली आहे.

पुणे स्मार्ट सिटीचे राष्ट्रीय रँकींग सुधारण्यासाठी प्रयत्न करा : अजित पवार

या महालाभार्थी वेबपोर्टलचे मंगळवारी (ता.२९) बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या झहस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी पुरंदरचे आमदार संजय जगताप, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, कृषी सभापती बाबुराव वायकर, महिला व बालविकास सभापती पूजा पारगे आणि सामाजिक न्याय सभापती सारिका पानसरे आदी उपस्थित होते. 

कार्यकर्त्याच्या पाठीशी अजितदादा खंबीरपणे उभे

ग्रामीण भागातील शेवटच्या घटकाचा विकास व्हावा, या उद्देशाने  पुणे विल्हा परिषद ही विविध कल्याणकारी योजना राबवीत असते.मात्र  या योजनांची माहिती  सर्वच   पात्र व्यक्तींपर्यंत पोहोचविण्याचे एक मोठे आव्हान असते. मात्र आता या वेबपोर्टलच्या माध्यमातून प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत जिल्हा परिषदेच्या योजना  पोहोचू शकणार आहेत.

मेधा कुलकर्णी झाल्या पुन्हा आक्रमक; बेकायदा कारखाना पाडला बंद 

या वेबपोर्टलमध्ये जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील योजनांसाठी एकच अर्ज असणार आहे. यामध्ये लाभार्थी घरबसल्या माहिती भरुन आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने अपलोड   करु शकणार आहेत. या आॅनलाइन अर्जांतील माहितीचे प्रमाणीकरण ग्रामपंचायत पातळीवरच होणार आहे. यामध्ये भरलेली माहिती कायम जतन राहणार आहे. त्यामुळे भविष्यात आपण कोणत्या योजनेसाठी पात्र ठरतो, हेही जागच्या जागीच कळू शकणार आहे.

याबाबतच्या अधिक माहितीसाठी www.punezp.mkcl.org या संकेतस्र्थळाला भेट द्यावी,असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी केले आहे.

Edited By - Prashant Patil