esakal | मधुमेही कोरोनाग्रस्तांसाठी महत्त्वाची बातमी; लठ्ठ असल्यास ऑपरेशन ठरेल संजीवनी 
sakal

बोलून बातमी शोधा

bariatric surgery beneficial for diabetic corona virus patients

लठ्ठपणा आणि त्यातून येणारा मधुमेह गेल्या दोन दशकात वेगाने वाढल्याचे दिसते. लठ्ठपणा आणि मधुमेह याचा थेट परिणाम शरिराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर होतो. या विकारांमध्ये प्रतिकारक शक्ती कमी होते, हे वैद्यकशास्त्राने यापूर्वीच सिद्ध केले आहे.

मधुमेही कोरोनाग्रस्तांसाठी महत्त्वाची बातमी; लठ्ठ असल्यास ऑपरेशन ठरेल संजीवनी 

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे : कोरोना विषाणूंच्या उद्रेकात जोखमीच्या रुग्णांचे प्रमाण कमी करण्यासाठी बॅरायाट्रिक शस्त्रक्रिया प्रभावी उपया असल्याचे जगमान्य होत आहे. लठ्ठ मधुमेही रुग्णांवरील शस्त्रक्रियेमुळे कोरोनाचा मृत्यूदर कमी होईल. त्यामुळे बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया आता जीवरक्षक असल्याची मोहोर ‘अमेरिकन सोसायटी फॉर मेटॅबोलिक अँण्ड बॅरियाट्रिक सर्जरी’ उमटवली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोना उद्रेकाच्या काळात कोणत्या शस्त्रक्रिया अत्यावश्यक आणि कोणत्या शस्त्रक्रियांना पुढे ढकलता येऊ शकतात, यावर ‘अमेरिकन सोसायटी फॉर मेटॅबोलिक अँण्ड बॅरियाट्रिक सर्जरी’मध्ये बहुमताने निर्णय घेण्यात आले. त्यात बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. उशिर करून चालणार नाही, अशा प्रकारातील ही शस्त्रक्रिया असल्याचेही या सोसायटीने ठळकपणे नमूद केले आहे.

जीवरक्षक कशी? 
लठ्ठपणा आणि त्यातून येणारा मधुमेह गेल्या दोन दशकात वेगाने वाढल्याचे दिसते. लठ्ठपणा आणि मधुमेह याचा थेट परिणाम शरिराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर होतो. या विकारांमध्ये प्रतिकारक शक्ती कमी होते, हे वैद्यकशास्त्राने यापूर्वीच सिद्ध केले आहे. आताच्या कोरोना उद्रेकातील मृत्यूदर कमी करण्यासाठी लठ्ठपणा आणि मधुमेह यांच्यावर प्राधान्यांने प्रभावी उपाय करणे आवश्यक आहे. त्यामुळे या शस्त्रक्रियेला जीवरक्षक म्हटले आहे.

आणखी वाचा - पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत भाजप-शिवसेना आमने-सामने
 
लठ्ठपणामुळे गुंतागुंत वाढते
लठ्ठपणामुळे शरीराची त्वचा ताणली जाऊन त्याचे दृष्यपरिणाम दिसतात. तसेच, श्वासोच्छासाचे आजार होण्याचं प्रमाण वाढतं. अशा लठ्ठ रुग्णाला कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्यास त्याच्या उपचारातील गुंतागुंत वाढण्याचा धोका असतो.
 
देशातील लॉकडाऊनचा परिणाम
या लॉकडाऊनमध्ये रुग्णांच्या शारिरीक हालचाली कमी झाल्या आणि ताणतणाव वाढले. त्यातून रुग्णांचे वजन वाढल्याचे दिसते. तसेच, मधुमेहाचे प्रमाण वेगाने वाढत आहे. त्यामुळे या दोन्हीतून येणारा धोकाही वाढताना दिसतो.

आणखी वाचा - पुण्यात कोरोना रुग्ण का वाढले? वाचा सविस्तर बातमी
 
तज्ज्ञ काय म्हणतात...
लठ्ठपणा कमी करण्यासाठी किंवा मधुमेह नियंत्रणाचा उपाय म्हणून बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून प्रभावी ठरत असल्याचे दिसते. त्याची गरज आता वाढल्याचे निरीक्षण तज्ज्ञ डॉक्टरांनी नोंदविले आहे. पण, अनलॉकच्या या पहिल्या टप्प्यात या रुग्णांवर उपचार करावे का, असा प्रश्न तज्ज्ञांना पडला आहे. पण, कोरोना पुढील काही महिने रहाणार आहे. त्यामुळे मधुमेही आणि लठ्ठ रुग्णांच्या जीवाचा धोका कमी करण्यासाठी या शस्त्रक्रियेला मान्यता दिली आहे.

अमेरिकेप्रमाणेच भारतातही कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. त्यात इतर आजार असलेल्या रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी बॅरियाट्रीक सर्जरीचा पर्याय आम्ही स्विकारणार आहोत. त्याबाबत देशभरात चर्चा सुरू आहे. ही शस्त्रक्रिया गरजेची असल्याने त्याला अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात प्राधान्य देण्यात येत आहे. त्यातून जोखमीच्या रुग्णांच्या जीवाचा धोका निश्चित कमी होईल.
- डॉ. शशांक शहा, माजी अध्यक्ष, ओबेसिटी सर्जरी सोसायटी आँफ इंडिया 

loading image