
-सुवर्णा कांचन
उरुळी कांचन : सोलापूरच्या दिशेने जात असताना मुक्या प्राण्याला वाचविताना दुभाजकाला धडकून चारचाकी आणि विरुद्ध पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या ट्रक यांचा समोरासमोर आल्याने भीषण अपघात झाला. ही घटना शुक्रवारी (ता. २२) सकाळी पावणे सहाच्या सुमारास सोडतापवाडी (ता. हवेली) हद्दीतील अल्फा पेट्रोल पंपासमोर घडली. महेश अंबादास गलगटे असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.