डॉ.आंबेडकरांच्या राष्ट्रीय सुरक्षा विचारांवर अभ्यासक्रम 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

पुणे - "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय राष्ट्रीय सुरक्षा यावरील विचार' या विषयावर एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या संयुक्त विद्यमाने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीचा सामंजस्य करार नुकताच करण्यात आला. 

या कराराप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, उपकुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, निबंधक डॉ. अरविंद शाळिग्राम, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे डॉ. विजय खरे, निबंधक सविता नलावडे आदी उपस्थित होते. या अभ्यासक्रमामध्ये आंबेडकरांचे पाकिस्तान, काश्‍मीरविषयक विचार, अंतर्गत सुरक्षितता, दहशतवाद, प्रांतीय प्रश्‍न, परराष्ट्र धोरण, अंतर्गत सुरक्षा निवारण व व्यवस्थापन, राष्ट्रीय सुरक्षेचे बदलते स्वरूप इत्यादी बाबींचा समावेश असणार आहे. हा अभ्यासक्रम शिकविण्यासाठी संरक्षण व सामरिक शास्त्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळणार आहे. सन 2015 पासून हा अभ्यासक्रम विद्यापीठामध्ये सुरू करण्यासंदर्भात बार्टीकडून प्रयत्न सुरू होते, असे बार्टीच्या वतीने सांगण्यात आले. 

Web Title: Barty and Savitribai Phule Pune University joint venture