बारामती : झारगडवाडी ग्रामस्थांचे स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषण

एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना दुसरीकडे झारगडवाडी (ता.बारामती) येथील नागरिकांनी मुलभूत सुविधा मिळत नसल्याने व बेकायदेशीर कामे करणाऱ्यास पाठीशी घालणाऱ्या प्रशासनावर कायदेशीर कारवाई करावी
basic facilities not available Fast to death of Jhargadwadi villagers Independence Day baramati
basic facilities not available Fast to death of Jhargadwadi villagers Independence Day baramatisakal

डोर्लेवाडी : एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना दुसरीकडे झारगडवाडी (ता.बारामती) येथील नागरिकांनी मुलभूत सुविधा मिळत नसल्याने व बेकायदेशीर कामे करणाऱ्यास पाठीशी घालणाऱ्या प्रशासनावर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी बारामती पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. झारगडवाडी येथील गायरान जागेमधील मंडल अधिकारी व तलाठी यांनी पंचानामा केलेल्या १६५ ब्रास बेकायदेशीर अवैध मुरूम चोरी करणाऱ्या संबधीतांकडून ५ पट दंड वसूल करावा. नागरी रहिवाशी वस्तीत गटाराचे सांडपाणी सोडणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी व पदाधिकारी यांचेवर साथरोग प्रतिबंध कायदा अंतर्गत व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कायद्याचा भंग केल्याप्रकरणी निलंबनाची व फौजदारी स्वरूपाची कारवाई व्हावी. तसेच अवैध उत्खनन केलेल्या खड्यात पडून दोन निष्पाप नागरिकांचा बळी घेणाऱ्या संबधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी उपोषणकर्ते यांनी केली आहे.

याबाबत ग्रामपंचायतीच्या सरपंच वैशाली मासाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या , मागील कार्यकारणीच्या काळात सदर घटना घडली आहे.मुरूम उत्खनन केलेल्या संबधितांवर प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी.निधीची अडचण असल्यामुळे नागरी वस्तीत सांडपाणी सोडले आहे, ही वस्तुस्थिती आहे.परंतु आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सदर ठिकाणी उघड्यावर सोडलेले सांडपाणी योग्य ठिकाणी सोडण्यासाठी बंदिस्त गटाराचे काम सुरु केली आहे.अजून निधी मंजूर आहे मात्र टेंडर प्रक्रिया झाली नसल्याने काम पूर्ण झाले नाही. ग्रामस्थांच्या गैरसोयी दूर करण्याचा ग्रामपंचायतीचा प्रामणिक प्रयत्न आहे.नागरिकांनी उपोषण सोडावे ,असे आवाहन मासाळ यांनी केले आहे. एक वर्षांपूर्वी आम्ही उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पोलीस अधिकारी व ग्रामपंचायत यांच्याशी समन्वयाने चर्चा झालेनंतर ६ महिन्यात मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. एक वर्ष उलटून गेले तरी कार्यवाही होत नसल्याने आम्ही उपोषणावर ठाम आहोत. आता न्याय मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com