बॅटरी कार धूळ खात पडून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

पुणे - रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना आधुनिक सोयीसुविधा देण्यासाठी भारतातील महत्त्वाची रेल्वे स्थानके ‘वर्ड क्‍लास’ करण्याची घोषणा केली. यामध्ये पुणे रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात आला. याअंतर्गत बॅंक ऑफ इंडियाच्या साह्याने नागरिकांना रेल्वे स्थानकात ‘बॅटरी कार’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, व्यवस्थापक मिळत नसल्याने, तीन ते चार वर्षांपासून ही बॅटरी कार धूळ खात पडून आहे.

पुणे रेल्वे स्थानकात बॅंक ऑफ इंडियाच्या साह्याने आठ वर्षांपूर्वी बॅटरी कार सुरू करण्यात आली. प्रमुख्याने ज्येष्ठ नागरिक, अपंग, गरोदर महिला यांच्यासाठी ही सुविधा करण्यात आली होती. बॅंकेने साह्य बंद केल्यापासून ही कार बंद पडली आहे. पुणे रेल्वे स्थानकाबरोबर ज्या अन्य स्थानकांत ही सुरू केली होती, तेथे ती सुरळीत सुरू आहे. रेल्वे प्रशासनाने या कारचे व्यवस्थापन नीट केले नसल्याची खंत रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी व्यक्त केली.

बॅटरी कारचे व्यवस्थापन रेल्वेकडे नाही. सुरवातीला बॅंक ऑफ इंडियाच्या साह्याने ही कार चालवली होती. ही सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी आम्ही एनजीओशी संपर्क करत आहोत. ही सेवा लवकरच सुरू करण्यात येईल.
- ए. के. पाठक, पुणे रेल्वे स्टेशन मास्तर 

Web Title: Battery Car railway station