बॅटरीचोरांनी केला ट्रक ड्रायव्हरचा निर्घृण खून

pune.jpg
pune.jpg

मांजरी (पुणे) : ट्रकची बॅटरी चोरायला विरोध केल्यामुळे चोरट्यांनी ट्रक ड्रायव्हरचा धारदार शस्त्राने भोकसून निर्घृण खून केला. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास द्राक्ष संशोधन केंद्रासमोर ही घटना घडली. हडपसर पोलिसांनी तीन संशयितांना खुनाच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. दत्तात्रय भोईटे (वय ४२ रा. फलटण,सातारा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. महेश बबन गजसिंह (वय २२), विजय बाळू सोनवणे (वय १९) दोघे (रा. उरळी देवाची, ता. हवेली) व चतुरघन मनोहर कळसे (वय २३ रा. कोंढवा, पुणे) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे सोलापूर रोडवरील द्राक्षबागायतदार संघ व टोल नाका परिसरात ट्रक चालक रात्रीच्या वेळी विश्रांतीसाठी थांबलेले असतात. ट्रकचालक झोपेत असल्याचा फायदा घेऊन तिघेजण ट्रकची बॅटरी काढत असल्याचा आवाज ट्रक ड्रायव्हरला आला. त्याने बॅटरी चोरांना हटकले असता, बॅटरी चोरांनी त्यांच्या छातीवर धारदार शस्त्राने भोकसून त्याचा निर्घृण खून केला. त्यानंतर बॅटरी चोरांनी धूम ठोकली. तेथील ट्रक ड्रायव्हरने हडपसर पोलिसांना माहिती दिली.

 बॅटरी चोरी करण्याची पद्धती व चोरांचा वावर यावरून पोलिसांनी त्यांचा माग काढला. जेएसपीएम कॉलेजच्या मागील मैदानात काही संशयित असल्याचे पोलिसांना समजले. त्यांना ताब्यात घेतले असता ट्रकचालकाचा खून त्या तीन आरोपींनी केल्याचे निष्पन्न झाले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com