ग्रुप ॲडमीन सावधान, मेंबरच्या एका चुकीचा असा बसेल फटका

मिलिंद संगई
Tuesday, 4 August 2020

अयोध्या येथे बुधवारी (ता. ५) होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या पायाभरणीच्या निमित्ताने पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून इशारा दिला आहे.

बारामती (पुणे) : अयोध्या येथे बुधवारी (ता. ५) होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या पायाभरणीच्या निमित्ताने पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून इशारा दिला आहे. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतील, असे मेसेज टाकू नये व ते सोशल मिडीयावर व्हायरल करू नये, जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. असे कृत्य केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली आहे. 

शरद पवार पुन्हा ठरले चाणक्य

महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 68 नुसार शिरगावकर यांनी नोटीस जारी केली आहे. सोशल मिडीया, मेसेज, व्हॉटसॲप, फेसबुक, ट्विटर, हॅलो, टेलिग्राम किंवा तत्सम माध्यमावरुन कोणत्याही डिजीटल माध्यमामध्ये दोन समाजात जातीय तेढ किंवा धार्मिक तेढ तसेच समाजात तिरस्कार निर्माण करणाऱ्या कोणत्याही स्वरुपाच्या खोट्या बातम्या कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह प्रसारीत करणाऱ्या ग्रुप ॲडमीनवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा शिरगावकर यांनी दिला आहे.

राष्ट्रवादीच्या आमदाराकडून सरकारला घरचा आहेर... 

याबाबत आपल्या ग्रुपमधील सदस्यांना ग्रुप ॲडमीनने सूचना द्याव्यात, खबरदारीचा उपाय म्हणून ग्रुप ॲडमीनने सेटींगमध्ये जाऊन फक्त ग्रुप ॲडमीन मेसेज सेंड करतील, असे सेटींग करुन घ्यावे, अशीही सूचना शिरगावकर यांनी दिली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Be careful when texting on social media about Ram temple