esakal | जास्तीत जास्त ग्राहकाभिमुख व्हा! - भूषण पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

सीओईपी - शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) आणि भाऊज आंत्रप्रेन्युअर सेल यांच्यातर्फे आयोजित ‘पुणे स्टार्टअप फेस्ट’मध्ये स्टार्टअपची माहिती देताना अमित कल्याणी व इतर मान्यवर.

‘तंत्रज्ञानासह जगही वेगाने बदलत असताना आपला व्यवसाय यशस्वी करण्यासाठी ‘अपडेट’ राहून नव्या गोष्टी आत्मसात करायला हव्यात. तसेच, आपण जास्तीत जास्त ग्राहकाभिमुख असायला हवे,’’ असे मत मल्टिप्लाय व्हेंचर्सचे संस्थापक आणि पेटीएम व अलिबाबाचे माजी संचालक भूषण पाटील यांनी व्यक्त केले.

जास्तीत जास्त ग्राहकाभिमुख व्हा! - भूषण पाटील

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘तंत्रज्ञानासह जगही वेगाने बदलत असताना आपला व्यवसाय यशस्वी करण्यासाठी ‘अपडेट’ राहून नव्या गोष्टी आत्मसात करायला हव्यात. तसेच, आपण जास्तीत जास्त ग्राहकाभिमुख असायला हवे,’’ असे मत मल्टिप्लाय व्हेंचर्सचे संस्थापक आणि पेटीएम व अलिबाबाचे माजी संचालक भूषण पाटील यांनी व्यक्त केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) आणि भाऊज आंत्रप्रेन्युअर सेल यांच्यातर्फे आयोजित ‘पुणे स्टार्टअप फेस्ट’चे उद्‌घाटन भूषण पाटील व भारत फोर्जचे अमित कल्याणी यांच्या हस्ते झाले. या वेळी बॅंक ऑफ महाराष्ट्रचे प्रशांत खटावकर, ‘सीओईपी’चे उपसंचालक प्रा. मुकुल सुतावणे आदी उपस्थित होते.

पुणे विमानतळावर अपघात होता होता वाचला; वाचा काय घडले!

पाटील म्हणाले, ‘‘स्टार्टअप सुरू करताना खर्चाच्या बाबतीत काटेकोर असणे गरजेचे आहे. ग्राहक अधिकाधिक स्वावलंबी होत असल्याने त्यानुसार आपल्या सेवेत बदल करणे क्रमप्राप्त आहे. जाहिरातीवर खर्च न करता लोकप्रिय स्टार्टअप कसा उभारावा याचे उत्तम उदाहरण व्हॉट्‌सअप आहे.’’

आणखी वाचा - पुणे-सातारा हायवेवर उद्या मार्गात बदल

कल्याणी म्हणाले, ‘‘सीओईपीने नेहमीच उच्च दर्जाचे अभियंते घडवले आहेत. कठोर मेहनत, जिद्द आणि कल्पनाशक्तीच्या जोरावर कोणीही स्टार्टअप सुरू करू शकतो. पाणी, रहदारी आणि शहरीकरण, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधा व समस्यांवर उत्तरे शोधणाऱ्या स्टार्टअप्सना मागणी असणार आहे.’’ 

खटावकर, प्रा. सुतावणे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा. माधुरी कर्णिक यांनी प्रास्ताविक केले, तर स्वराली व जनीत यांनी सूत्रसंचालन केले. जागृती जेठवानीने आभार मानले.

loading image