खंडणी मागत व्यावसायिकांना केली मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Crime
Crime

माळेगाव - बारामती एमआयडीसीत व्यावसायिकांना खंडणी मागत केलेल्या मारहाण प्रकरणी तालुका पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. बारामती एमआयडीसी भागातील दोघा छोट्या व्यावसायिकांकडे दरमहा पाच हजार रुपये हप्ता देण्याची मागणी करत त्यांना मारहाण करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित आरोपींनी हाॅटेलातील खुर्च्या, टेबलांची मोडतोड करत आईसक्रिम चालकाच्या दुकानातील रोख रक्कम जबरीने चोरून नेली. मंगळवार (ता. 19) रोजी दुपारच्यावेळी सदर घटना घडली. त्या प्रकरणी सोमनाथ रामचंद्र महानवर यांनी आज (बुधवारी)  शुभम खराडे (पूर्ण नाव नाही, रा. शेटफळ गढे, ता. इंदापूर) व त्याचे दोन अनोळखी साथीदार यांच्या विरोधात खंडणीसह जबरी चोरीची फिर्य़ाद दिली. दरम्यान, रुई गावातील संदीप काॅर्नर येथे महानवर हे संदीप चायनीज हाॅटेल चालवत उपजिविका करतात. त्यांच्या हाॅटेलशेजारी उगमालाल गोमाजी गाडरी हे संजीवनी आईसक्रिमचे दुकान चालवतात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मंगळवारी फिर्यादी हाॅटेलात असताना त्यांच्या तोंडओळखीचा शुभम खराडे व त्याचे दोन साथीदार हाॅटेलात आले. त्यांनी चायनीज पदार्थांची आर्डर दिली. पदार्थ खाल्यानंतर 460 रुपये बिलाची फिर्यादीने मागणी केली. यावेळी खराडे यांनी अश्लिल शिविगाळ करत मला बिल मागतो, तुला जर हाॅटेल चालवायचे असेल तर मला दरमहा 5 हजार रुपये द्यावे लागतील, नाही तर हाॅटेल बंद करावे लागेल अशी धमकी दिली. खराडे व त्याच्या दोन्ही साथीदारांनी हाॅटेलातील खुर्च्या उचलून फिर्यादीच्या अंगावर फेकून मारल्या. त्यामुळे फिर्यादीच्या डाव्या डोळ्याला तसेच मनगटाला दुखापत झाली.

हाॅटेलमधील स्टुलची आरोपींनी मोडतोड केली. त्यानंतर या तिघांनी बाजूचे आईसक्रिम दुकानदार उगमालाल गाडरी यांना लाथा बुक्कांनी मारहाण करून त्यांच्या पॅन्टच्या पाठीमागील खिश्यातील पाकिट तसेच आईसक्रिम दुकानाच्या गल्लातील पैसे अशी 4 हजार 200 रुपयांची रक्कम जबरीने काढून घेतली. या दोघांचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे सर्व दुकानदार, दुकानीतील ग्राहक, लोक जमा झाल्यावर शुभम खराडे याने त्याच्या कमरेला पाठीमागील बाजूस खोचलेला चाकू हातात घेवून आमच्या दिशेने उगारून, कोणी जर पुढे आला तर एकेकाचा मुडदा पाडेल अशी धमकी दिली. त्यामुळे सर्व दुकानदार घाबरुन दुकान बंद करून पळून गेले. आरोपी तेथून दोन मोटार सायकलीवरून निघून गेल्यावर फिर्यादी श्री. महानवर व लगतच्या दुकानदारांनी पोलिस ठाण्यात कैफियत मांडली. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com