लोणावळा रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

लोणावळा - लोणावळा हे देश विदेशातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. याचा विचार करून रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण करण्याचे काम वेगात सुरू आहे. प्रशस्त वाहनतळाची उभारणी, आकर्षक प्रवेशद्वार, स्टेशन परिसराची सजावट, परिसरातील पर्यटनस्थळांची माहिती, प्रदर्शन, स्मरणवस्तू विक्री केंद्र आदी गोष्टींचा त्यात समावेश आहे. 

लोणावळा - लोणावळा हे देश विदेशातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. याचा विचार करून रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण करण्याचे काम वेगात सुरू आहे. प्रशस्त वाहनतळाची उभारणी, आकर्षक प्रवेशद्वार, स्टेशन परिसराची सजावट, परिसरातील पर्यटनस्थळांची माहिती, प्रदर्शन, स्मरणवस्तू विक्री केंद्र आदी गोष्टींचा त्यात समावेश आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

देशतील महत्त्वाच्या स्टेशनमध्ये लोणावळ्याचा समावेश आहे. पाश्‍चात्त्य देशांमध्ये अशा पर्यटनस्थळी रेल्वे स्टेशनची रचनाही मोठी मोहक आणि त्या पर्यटनस्थळाला साजेशी असते. या पार्श्‍वभूमीवर 'इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन'तर्फे रेल्वे स्टेशनचा विकास करण्यात येत आहे. स्टेशनचे छत रोममधील एखाद्या इमारतीच्या छतासारखेच टोलेजंग आहे. याचबरोबर स्टेशनच्या पुनर्विकासाबरोबर सुशोभीकरणावरही भर दिला जाणार आहे. स्टेशन परिसरात स्वच्छता व प्रवाशांच्या सुविधांसाठी विशेष प्रयत्न केले जात आहे. सीसीटीव्ही यंत्रणा अद्ययावत केली आहे. रेल्वेची मालकी असलेला येथील भुशी धरणाची जागाही पर्यटनाच्यादृष्टीने विकसित करण्याचे नियोजन मध्य रेल्वेने सुरू केले आहे, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. 

लोणावळा, माथेरानला पर्यटकांची पसंती 
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात लोणावळा आणि माथेरान ही दोन थंड हवेची ठिकाणे आहेत. या दोन्ही ठिकाणी पर्यटकांचा ओढा जास्त असतो. देशभरातील काही महत्त्वाची रेल्वे स्टेशन जागतिक दर्जाच्या धर्तीवर रेल्वेतर्फे विकासित करण्यात येत आहेत. पाश्‍चात्त्य देशांची सौंदर्यदृष्टी आणि त्यांनी केलेल्या पर्यटनस्थळांतील स्टेशनप्रमाणे येथेही विकास करण्याचा प्रयत्न रेल्वेच्या वतीने सुरू आहेत. लोणावळ्यासह नेरळ आणि माथेरानचाही विचार होत आहे. पर्यटनस्थळांच्या स्टेशनचे सुशोभीकरण करून ही स्टेशन 'पर्यटन स्टेशन' बनवण्याचा प्रयत्न होणार आहे. लोणावळ्याच्या पर्यटनाची आठवण मनात राहावी, पर्यटनास चालना मिळावी यासाठी 'सेल्फी पॉइंट' उभारण्याचा प्रस्ताव आहे. 

फलाट क्र.2 व 3 वर 'वेदर शेड'ची उभारणी करावी 
रेल्वेच्या वतीने फलाटांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. मात्र, फलाट क्र.2 व 3 वर पूर्णपणे वेदर शेड नाही. त्यामुळे प्रवाशांना ऊन-पावसात ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे फलाटावर संपूर्णपणे 'वेदर शेड'ची उभारणीबरोबर अद्ययावत स्वच्छतागृह उभारावे, अशी मागणी प्रवासीसंघटनेचे सदस्य ललीत सिसोदीया यांनी केली आहे.

Web Title: Beautification of Lonavala Railway Station