कुठेही पाहायला मिळणार नाही असा...ओझर्डेचा सुंदर धबधबा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

द्रुतगती महामार्गावर डोंगरालगत वसलेले ओझर्डे गाव. गावा व्यतीरिक्त कोणालाही माहिती नसणारा, कुठेही पहायला मिळणार नाही असा जाईबाई मंदिराच्या समोरील अप्रतिम धबधबा.

बेबडओहोळ : द्रुतगती महामार्गावर डोंगरालगत वसलेले ओझर्डे गाव. गावा व्यतीरिक्त कोणालाही माहिती नसणारा, कुठेही पहायला मिळणार नाही असा जाईबाई मंदिराच्या समोरील अप्रतिम धबधबा.

द्रुतगती महामार्गावर वसलेले डोंगर कुशीतील ओझर्डे गाव पावसाळ्यात निसर्ग सौंदर्याने न्हाउन निघते. गावातील भात खाचरे, हिरवेगार डोंगर, कोसळणारे धबधबे, गावातील अजुनही काही कौलारू घरे गावातील निसर्ग सौंदर्यात अजुन भर पाडत आहे. माञ, गेली कित्येक वर्षापासून पर्यटन प्रेमी व पंचक्रोशीतील नागरिकांनाही ओझर्डे येथील या सुंदर धबधब्यांची कल्पना नाही.

सध्या मुसळधार पावसामुळे जाईबाई मंदिराच्या समोरील धबधबा कुठेही पहायला मिळणार नाही. काताळाला टाका असल्या कारणाने पाणी प्रचंड वेगाने पाईपमधुन बाहेर पडावे तसे कातळापासून बरेच पुढे पडत आहे. एखादा मोठा पाईप फुटल्यानंतर पाणी जसे दिसते त्याप्रमाणे हे पाणी दिसत आहे.

पर्यटक लोणावळा, मळवली, खांडी, भूशी, पवना आदी धरणे बघण्याकरीता मोठ्या वाहतूकीवरून या ठिकाणी जातात. पण, याच आढे ओझर्डे, ऊर्से डोंगरावर अनेक छोटे मोठे धबधबे आहेत. बऱ्यापैकी वाहने डोंगरापर्यंत पोहचत असल्याने सोमाटणे येथून हा धबधबा आठ किलोमीटर अंतरावर हा ओझर्डेचा सुंदर धबधबा आहे. तसेच या धबधब्यासमोर असणारे जाईबाई माता मंदीर जागृत असून महाराष्ट्रातून भाविक या ठिकाणी याञेला व इतर वेळेस दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे पर्यटकप्रेमींना अगदी जवळ असलेल्या या धबधब्याचा आनंद कुठलाही वाहतूकीचा व गर्दीचा ञास न होता घेता येईल.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The beautiful waterfall of the Ozarde