सीसीटीव्ही बसवल्याने यात्रेतील कार्यक्रम शांततेत

चिंतामणी क्षीरसागर
गुरुवार, 12 एप्रिल 2018

वडगाव निंबाळकर (पुणे) : वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील करमणुकीच्या कार्यक्रमात गोंधळ ठरलेला. दरवेळी अतिउत्साही तरूणांची भांडणे सोडावुन कंटाळलेल्या यात्रा कमिटीने यावेळी कार्यक्रमस्थळी सीसीटीव्ही बसवले. गडबड झाली तर फुटेज पोलीसांना देऊन कारवाई केली जाईल असे घोषीत केले. याचा चांगला परिणाम झाला आणि कार्यक्रम शांततेत पार पडला.

येथील ग्रामदैवत भैरवनाथांच्या यात्रे निमित्त शनिवार ता. ७ ते मंगळवार ता. १० पर्यंत चार दिवसात विविध कार्यक्रम मोठ्या उत्सहात पार पडले. करमणुकीच्या कार्यक्रमात भांडणे होत असल्याने यंदा कार्यक्रम ठेवू नयेत असा मुद्दा काही ग्रामस्थांनी मांडला. यावर बैठकीत बराच खल झाला. शांतता कमिटीची स्थापना करून अखेर कार्यक्रमाचे आयोजन केले.

कार्यक्रमस्थळी सीसीटीव्ही बसवण्याचे ठरले. यामधे गोंधळ करणाऱ्या युवकांवर कायदेशीर कारवाई करायची व कार्यक्रमासाठी झालेला खर्च वसुल करायचा असे ठरले आणि गावकऱ्यांची योजना सफल झाली. करमणुकीचे सर्व कार्यक्रम शांततेत पार पडले. शनिवार (ता. ७) सकाळी श्रींचा हळदी समारंभ, रात्री नाथांची कथा यानंतर गुलालाची उधळण करीत श्रींचा लग्न सोहळा पार पडला. रविवारी पहाटे रूद्राभिषेक, दंडवत, नैवद्य असे परंपरे प्रमाणे धार्मिक विधी झाले. रात्री श्रींचा सवाद्य छबीना झाला. चांगभलेच्या गजरात नगरप्रदक्षणा केली. यावेळी नेत्रदिपक आताषबाजी करण्यात आली. महिलांसह भावीक मोठ्या संख्यने उपस्थीत होते. सोमवार ता. ९ कुस्त्यांचा आखाडा झाला. रात्री प्रकाश अहिरे यांच्या लोकनाट्य तमाशा झाला मंगळवार ता. १० किशोरकुमार यांचा ऑर्केस्ट्रा झाला.

Web Title: because of cctv cameras no mess in program