esakal | "चांगला व्यावसायिक बनून राजकारणात या"
sakal

बोलून बातमी शोधा

rohit pawar

"चांगला व्यावसायिक बनून राजकारणात या"

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : व्यवसायासाठी राजकारणात येऊ नका, तर चांगला व्यवसायिक बनून राजकारणात या, असा सल्ला आमदार रोहित पवार यांनी ‘यिन’च्या मंत्रिमंडळाला दिला. ‘यिन’ मुख्यमंत्र्यांच्या पुणे दौऱ्याच्या सांगता प्रसंगी यिनच्या मंत्रिमंडळाने पवार यांची भेट घेतली.

हेही वाचा: पुणे ते लडाख - श्वेताची यशस्वी बाईक सफर

व्यवसाय आणि राजकारण या विषयांवर पवार यांनी शॅडो मंत्रिमंडळाशी संवाद साधला. ‘यिन’मुळे चांगले काम करण्याची संधी मिळाली असून, त्याचा जास्तीतजास्त वापर तरूणांनी करून घ्यावा, असा सल्ला त्यांनी दिला. ते म्हणाले,‘‘आपण जसे आहोत तसेच काम करत राहणे त्यातूनच चांगला समाजसेवक घडत असतो. अभ्यास करून कोणताही कार्यक्रम घेतला पाहिजे. ते करत असताना इतरांना कॉपी करू नका. त्यांचे चांगले गुण स्वीकारा आणि त्यातून संवेदनशील राहायला शिका. एखादी गोष्ट कमी वेळेत कशी पूर्ण करता येईल याकडे लक्ष द्या, त्यासाठी इतिहासामधील प्रेरणा घ्या. जातीवाद, धर्म वाद बाजूला ठेवून लोकात राहता आले पाहिजे.’’

हेही वाचा: आळंदीत माऊली जन्मोत्सव साजरा

यावेळी ‘यिन’ मुख्यमंत्री अजय खंडबहले, उपमुख्यमंत्री विशाल पाटील, महिला व बालकल्याणमंत्री सृष्टी मोरे, अन्न व नागरी पुरवठामंत्री श्रद्धा खोरगडे, ग्रामविकास मंत्री प्रथमेश काशीद, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सम्मेद कालभावी, नगरचे अध्यक्ष अनिकेत कुलकर्णी उपस्थित होते. भेटीनंतर ‘यिन’ मंत्रिमंडळ मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

loading image
go to top