esakal | वेलांकनी देवीच्या उत्सवाला खडकीत प्रारंभ 
sakal

बोलून बातमी शोधा

KIR19A00034.jpeg

वेलांकनी देवीच्या उत्सवाला खडकीत प्रारंभ 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


पुणे ः ख्रिस्ती बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या वेलांकनी देवीच्या उत्सवाला नुकताच प्रारंभ झाला. येथील सुमारे सव्वाशे वर्ष जुन्या ब्रिटिशकालीन सेंट इग्नेशिअस चर्चमध्ये दरवर्षी हा उत्सव भरवला जातो. यंदाचे या उत्सवाचे 47 वे वर्ष आहे. 
या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये समाजातील सर्व जाती-धर्मांचे नागरिक सहभागी होतात. मदर मेरीची निशाणी म्हणून ध्वजवंदन करून उत्सवाला सुरवात झाली; तसेच फादर वॉल्टर सिंगरायन यांच्या हस्ते उत्सव कार्यक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले. 
या वेळी चर्चचे अध्यक्ष फादर जेसू अँथनी, उपाध्यक्ष फ्रान्सिस डेव्हिड, फादर आनंद गायकवाड, जेरी फर्नांडिस व चर्चचे कार्यकर्ते दिलराज पिल्ले, पॉल नायर, ऍलेक्‍स जेम्स, इव्हॉन लोबो, अँथोनी परेरा आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. 
दरम्यान, या उत्सव काळात चर्चेच्या वतीने आरोग्यतपासणी, रक्तदान शिबिर आदी विविध उपक्रम राबविण्यात आले. पुणे परिसर, तसेच बाहेरगावांतील फादर येथे प्रवचन देण्यासाठी येतात. तमीळ, कोकणी, हिंदी, मराठी व इंग्रजी आदी भाषांमध्ये दररोज मार्गदर्शन होते; तसेच ऍम्युनिशन व एचई फॅक्‍टरीच्या वतीने या ठिकाणी येणाऱ्या भक्तांना दररोज अन्नदान केले जाते. हा उत्सव 8 सप्टेंबरपर्यंत चालणार असल्याची माहिती उपाध्यक्ष डेव्हिड यांनी दिली. 
 

loading image
go to top