टेमघर धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

या वर्षी पावसाळ्यात हे धरण दोन वेळा भरून वाहिले होते. त्यामुळे तसेच या भागात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाची गळती प्रतिबंधक कामे सुरू करता आली नव्हती. मात्र, आता पडणारा पाऊस पुर्णपणे थांबला असून, खडकवासला धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याने या धरणातील पाणी खडकवासला धरणात सोडण्यास सुरुवात झाली आहे. या वर्षांपासून या धरणातून जलविद्युत निर्मीती करण्यास देखील सुरुवात झाली आहे. 

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांपैकी टेमघर धरण हे एक महत्वाचे धरण असून, या धरणातून होणाऱ्या पाण्याची गळती रोखण्याचे काम सुरू आहे. सन 2017 पासून गळती प्रतिबंधक कामास सुरुवात झाली असून धरणातील 90 टक्के गळती रोखण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे.

या वर्षी पावसाळ्यात हे धरण दोन वेळा भरून वाहिले होते. त्यामुळे तसेच या भागात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाची गळती प्रतिबंधक कामे सुरू करता आली नव्हती. मात्र, आता पडणारा पाऊस पुर्णपणे थांबला असून, खडकवासला धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याने या धरणातील पाणी खडकवासला धरणात सोडण्यास सुरुवात झाली आहे. या वर्षांपासून या धरणातून जलविद्युत निर्मीती करण्यास देखील सुरुवात झाली आहे. 

महिनाभरात धरण रिकामे करून धरणात ग्राऊंटिंग व शॉटक्रीट ही कामे हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी दिली. या अनुषंगाने केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन संस्थेमार्फत प्रकल्पस्थळी आवश्यक वैज्ञानिक चाचण्या घेण्यात येत आहेत.

मे-2020 अखेर पर्यंत धरणातील गळती रोखण्यासाठी सुचवलेल्या शॉर्ट टर्म उपाययोजना पूर्णत्वास आणून त्यानंतर दीर्घकालीन उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत. शासनाने या प्रकल्पावर मार्गदर्शन करण्यासाठी पॅनल ऑफ एक्सपर्ट ही उच्चस्तरीय समिती नेमली असून समितीच्या दिशादर्शनाखाली या हंगामात करावयाच्या कामास सुरुवात करण्यात येणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Begin to release the water from the Temghar Dam