इंदापूर तालुक्यामध्ये द्राक्षाच्या हंगामास सुरवात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

वालचंदनगर  : बोरी (ता.इंदापूर) परिसरामध्ये द्राक्षाच्या हंगामास सुरवात झाली असून द्राक्षांना उच्चांकी दर मिळू लागला अाहे. इंदापूर तालुक्यातील बोरी हे द्राक्ष शेतीचे अागार म्हणून ओळखले जाते. ऑगस्ट महिन्यामध्ये छाटणी केलेल्या द्राक्ष बागा उत्पादनाच्या अंतीम टप्यामध्ये आहेत. बोरी येथील संतोष भानुदास धायगुडे या शेतकऱ्यांने आज (सोमवार) पासुन द्राक्षाच्या व्रिकीला सुरवात केली

धायगुडे यांच्याकडे शरद सिडलेस या जातीची द्राक्षे असून १३५ प्रतिकिलो रुपये दर मिळाला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये छाटणी केलेल्या द्राक्षांना दर चांगला मिळत असतो. मात्र, हवामानातील बदलामुळे नुकसान होण्याचा धोका माेठ्या प्रमाणात असतो. गतवर्षीपेक्षा चालू वर्षी द्राक्षबागेमध्ये जास्त द्राक्षाचे घड असून एकरी दहा ते बारा टन उत्पादन निघले अशी अपेेक्षा असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
 
Web Title: Beginning of grape harvest in Indapur taluka