‘ती’च्या शोधामुळे खगोलशास्रात नवा अध्याय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘ती’च्या शोधामुळे खगोलशास्रात नवा अध्याय

‘ती’च्या शोधामुळे खगोलशास्रात नवा अध्याय

पुणे : नारायणगाव जवळील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) या महाकाय दुर्बिणीच वापर करत बर्नाली दास या भारतीय संशोधक विद्यार्थिनीने खगोलशास्रात एक नव्या अध्याय रचला आहे. सन २००० मध्ये शास्रज्ञांनी एक दुर्मिळ तारा शोधला होता. त्यानंतर तशा प्रकारचे गुणधर्म दाखविणारा एकही तारा शोधता आला नाही. मात्र, बर्नालीने मागील दोन वर्षांत तब्बल ११ ताऱ्यांचा शोध घेत यासंबंधीच्या खगोलशास्रातील संशोधनाला चालना दिली आहे.

हेही वाचा: रविवारी होणारी TET आणि UGC नेट परीक्षा एकाच दिवशी; वाचा सविस्तर

पुणे स्थित राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रात (एनसीआरए) नुकतीच पीएच.डी. पूर्ण करणारी बर्नाली ‘मेन्स सिक्वेन्स रेडिओ पल्स एमिटर’ (एमआरपी) प्रकारातील ताऱ्यांवर संशोधन करत आहे. प्रचंड ताकदीचे विलक्षण चुंबकीय क्षेत्र असलेल्या या ताऱ्यातून उत्सर्जित होणारी स्पंदने अद्ययावत जीएमआरटीच्या साहाय्याने टिपण्यात आली आहे. २०१९ च्या मध्यात सुरू झालेल्या या संशोधनातून कन्या राशीत दिसणाऱ्‍या ११ ताऱ्यांची निरीक्षणे बर्नालीने नोंदविले आहे. प्रा. पुनम चंद्रा यांच्या मार्गदर्शनाखाली तीने संशोधन केले आहे. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेला एनसीएरएचे संचालक प्रा. यशवंत गुप्ता, प्रा. जयराम चेंगलुरू, डॉ. जे.के.सोलंकी आदी उपस्थित होते.

हेही वाचा: पदार्पणाच्या सामन्यात हर्षलची हवा; टीम इंडियासमोर 154 धावांचे आव्हान

असे झाले संशोधन..

 • दृष्य प्रकाशाच्या साहाय्याने निरीक्षणे घेणाऱ्या दुर्बिणींकडून आकाशगंगेतील ताऱ्यांसंबंधी माहिती गोळा करण्यात आली

 • एवढ्या ताकदीने रेडिओ स्पंदने उत्सर्जित करू शकतील अशा संभाव्य ताऱ्यांची निवड झाली

 • अद्ययावत जीएमआरटीच्या साहाय्याने विशिष्ट वेळेला आणि विशिष्ट वारंवारीतेला निरीक्षणे घेण्यात आली

 • मेन्स सिक्वेन्स रेडिओ पल्स एमिटर नावाच्या ११ ताऱ्यांची नोंद झाली

 • अमेरिकेतील व्हीएलए या रेडिओ दुर्बिणीचाही संशोधनासाठी वापर

संशोधनाचे महत्त्व :

 • सन २००० पर्यंत अशा प्रकारातील फक्त एक तारा शास्रज्ञांना माहीत होता. आता १५ ताऱ्यांची पुष्टी झाली आहे.

 • ताऱ्याचे तापमान आणि चुंबकीय क्षेत्र रेडिओ स्पदनांची तीव्रता ठरविण्यात भूमिका बजावत असल्याचे स्पष्ट

 • प्रचंड ताकदीने पल्सार ताऱ्याप्रमाणे स्पंदने उत्सर्जित करणाऱ्या या ताऱ्यांची संख्या वाढल्यामुळे यातील संशोधनाला वेग

 • महाकाय चुंबकीय ताऱ्यांवर विशिष्ट ठिकाणी होणाऱ्या स्फोटांची प्रयोगाद्वारे पुष्टी

ताऱ्यांचे वैशिष्ट्ये :

 • पल्सार ताऱ्याप्रमाणे रेडिओ स्पंदने उत्सर्जित करतात

 • आपल्या सूर्याच्या दोन ते अधिक पटीने मोठे

 • सुर्यापेक्षा १३ पटीने जास्त वस्तुमान आणि जास्त उष्‍ण

 • ताऱ्यांचा स्वतःभोवती फिरण्यासाठी अर्धा दिवसे ते अधिक कालावधी लागतो

या रेडिओ दुर्बिणींचा वापर

१) जीएमआरटी, पुणे : ४०० ते ८५० मेगाहर्ट्झ

२) अमेरिकास्थित कार्ल जान्स्की व्हेरी लार्ज अरे (व्हीएलए) : १ ते ४ गिगाहर्ट्झ

loading image
go to top