बारावीच्या विद्यार्थ्यांनो, फार्मसी क्षेत्रात उत्तम रोजगाराच्या संधी कोणत्या आहेत, हे तुम्हाला माहित आहे का?

Pharmacy
Pharmacy

नवीन औषधांची निर्मिती व उत्पादन करणे, नवनवीन औषधे शोधणे, जी औषधे आहेत त्यांच्यात काळानुसार बदल/ विकास करणे, औषधांची गुणवत्ता तपासणे आणि सांभाळणे, औषधे बाजारात आणण्यापूर्वी प्रयोगशाळेत त्यांच्या तपासण्या करणे, या औषधांचा मानवी शरीरावर दुष्परिणाम (साइड इफेक्ट) होऊ नये, ही सर्व कामे फार्मासिस्ट करत असतो.

इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी (आयटी) कंपन्या म्हणून ओळख असणार्‍या कंपन्यासुद्धा औषधनिर्मितीकडे वळत आहेत. जगात औषधनिर्मिती क्षेत्रात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. सर्वांत स्वस्त औषध पुरवठादार म्हणून भारताची ओळख आहे. अनेक दुर्धर आजारांवरील औषधांवरदेखील भारतात यशस्वी संशोधन होत आहे. आरोग्यविषयक अनेक सॉफ्टवेअर विकसित होत आहेत. क्लिनिकल रिसर्च, क्लिनिकल ट्रायल्स, फार्माकोव्हिजिलन्स, बायोइन्फॉरमॅटिक्स, फार्माकोइन फॉरमॅटिक्स इत्यादी क्षेत्रे खुली होत आहेत. केमिकल कंपन्यांमध्येसुद्धा ‘फार्मसी’चे शिक्षण घेतलेले उमेदवार मोठ्या प्रमाणात आवश्यक असतात.

- कोरोनानंतर आता महाराष्ट्राला सगळ्यांत मोठी संधी; सांगतायत डॉ. अमोल कोल्हे

- शैक्षणिक पात्रता :
फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बारावीत (विज्ञान) आवश्यक त्या गुणांनुसार पास असणं आवश्यक आहे.

- अभ्यासक्रम:
1. डी. फार्मसी (औषध निर्माणशास्त्र पदविका)
बारावीनंतर दोन वर्षांचा हा कोर्स असतो. बारावीच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित/ जीवशास्त्र यांतील गुणांनुसार या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. पदविका अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर पदवीच्या थेट द्वितीय वर्षात प्रवेश मिळतो. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, शासकीय विभागात आणि फार्मसीचे दुकान या संधी उपलब्ध असतात.

2. बी. फार्मसी (औषध निर्माणशास्त्र पदवी)
बारावीनंतर चार वर्षांचा हा कोर्स असतो. बारावीनंतर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित/ बायोटेक्नॉलॉजी/ जीवशास्त्र हे विषय घेऊन बारावीत (विज्ञान) आवश्यक त्या गुणांनुसार उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तसेच महाराष्ट्र शासनाची एमएचटी-सीईटी ही परीक्षा दिलेली असावी. औषध निर्माण कंपन्यांमध्ये तसेच शासकीय विभागात नोकरीच्या संधी असतात.

3. एम. फार्मसी (औषध निर्माणशास्त्र पदव्युत्तर पदवी)
बी. फार्मसीनंतर दोन वर्षांचा हा कोर्स असतो. एम फार्मसी हा अभ्यासक्रम फार्मस्युटिक्स, फार्मस्युटिकल केमिस्ट्री, फार्मकॉलॉजी, फार्मकॉग्नोसी, क्वालिटी अ‍ॅश्युरेन्स, क्वालिटी अ‍ॅश्युरेन्स टेक्निक्स, इंडस्ट्रियल फार्मसी इत्यादी विषयांमध्ये पूर्ण करता येतो. हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर फार्मसी क्षेत्रातील विविध कंपन्यांमधील संशोधन विभागांमध्ये नोकरी करता येते. तसेच डी. फार्मसी व बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांना शिकवता येते.

4. डी. फार्म (डॉक्टर ऑफ फार्मसी)
हा नवीन कोर्स आहे. बारावीनंतर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, व गणित/ बायोटेक्नॉलॉजी/ जीवशास्त्र हे विषय घेऊन बारावीत (विज्ञान) आवश्यक त्या गुणांनुसार (खुला वर्ग- 50 टक्के आणि मागास वर्ग- 45 टक्के) पास असणं आवश्यक आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या सीईटी परीक्षेत कमीत कमी 50 टक्के गुण मिळालेले असावेत. बारावीनंतर हा सहा वर्षांचा कोर्स असून, डॉक्टरसोबत या विद्यार्थ्यांना काम करावे लागत असल्याने हे विद्यार्थी डॉक्टरला औषध लिहून देण्यात मदत करू शकतात. हे विद्यार्थी फार्मसिस्ट आणि डॉक्टर यांच्यातील दुवा असतात.

नोकरीच्या संधी :
फार्मसी पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी व डॉक्टर ऑफ फार्मसी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय क्षेत्रात, केमिकल इंडस्ट्रीज, अन्न व औषध प्रशासन इत्यादी क्षेत्रांत संधी मिळतात. तसेच स्वतःचे मेडिकल स्टोअर सुरू करता येते. बायोटेक्नॉलॉजी कंपन्यांमध्येही फार्मासिस्ट ना चांगल्या संधी उपलब्ध आहेत. काही जण फार्मास्युटिकल प्रॉडक्ट्सच्या सेल्स व मार्केटिंगचेही काम करतात.

काही उपलब्ध पदांची माहिती :
1. फार्मासिस्ट
फार्मसी पदवीधारकांना हेल्थ सिस्टिम फार्मासिस्ट, हॉस्पिटल फार्मासिस्ट, कम्युनिटी फार्मासिस्ट, इंडस्ट्रियल फार्मासिस्ट, रिटेल फार्मासिस्ट आणि रिसर्च फार्मासिस्ट म्हणून काम करता येते.
2. क्वालिटी अ‍ॅश्युरन्स
क्लिनिकल केअर योजना विकसित करणे, प्रतिकूल औषधोपचाराच्या घटनांचा तपास करणे, तसेच असाध्य आजारांविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम क्वालिटी अ‍ॅश्युरन्समध्ये काम करणारे फार्मसी पदवीधर विद्यार्थी करतात.
3. क्वालिटी कंट्रोल
औषधे नियामक मंडळाच्या नियमानुसार गुणवत्ता पूर्ण औषधांची निर्मिती होत आहे की नाही, हे पाहण्याचे काम क्वालिटी कंट्रोलमध्ये काम करणारे फार्मसी पदवीधर विद्यार्थी करतात.
4. क्लिनिकल रिसर्च
बायोईक्विलन्स, बायोआवालिटी, सेंट्रल लॅबॉरेट्रीज यासारख्या ठिकाणी क्लिनिकल ट्रायल्स, क्लिनिकल रिसर्च, इन्व्हेस्टिगेशन, टेक्निकल रायटर्स इत्यादी पदांवर काम करण्यासाठी फार्मसी पदवीधर लागतात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com