'बेटी बचाव बेटी पढाओ' जिल्हा कार्यकारिणीमध्ये अशोक वणवेंची निवड

प्रशांत चवरे
गुरुवार, 12 एप्रिल 2018

भिगवण - महाराष्ट्र राज्य भाजपच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या बेटी बचाव बेटी पढाव उपक्रमाच्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये पुणे जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष अशोक वणवे यांची निवड करण्यात आली आहे. बेटी बचाव बेटी पढाव उपक्रमाची जिल्हा स्तरीय बैठक जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच पुणे येथे संपन्न झाली. 

यावेळी जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे यांनी सदस्यपदासाठी पुणे जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष अशोक वणवे यांचे नाव सुचविले त्याला उपस्थित सदस्यांनी मान्यता दिली. त्यानंतर आमदार भेगडे, प्रदेश संयोजक शाम सातपुते यांनी श्री.वणवे यांना निवडीचे पत्र प्रदान केले. या उपक्रमाबाबत बोलताना अशोक वणवे म्हणाले, स्त्री भ्रुणहत्या तसेच मुलींच्या शिक्षणासारख्या महत्वाच्या विषयावर या अभियानाच्या माध्यमातून लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. प्रामुख्याने प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवुन मुलींना आत्मनिर्भर करण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविण्यात येतील. सामाजिकदृष्या अत्यंत महत्वाच्या अशा अभियानांमध्ये माझा समावेश करुन घेतल्याबद्दल विशेष आनंद आहे.

Web Title: 'Beti Rescue Beti Padhao' district executive Ashok Vannav