पुणेकरांनो सावधान! फेसबुक अकाऊंट हॅक होतायत अन्... 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

त्याच्या मागणीला आज पुणे शहरातील दोघे बळी पडले आहेत. या दोघांची ६० हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. 

पुणे : पुणेकरांनो सावधान, मुंबईतील एक हॅकर रविवारी (ता.३१) सकाळपासून अनेकांचे फेसबुक अकाऊंट हॅक करु लागला आहे. हॅक केलेल्या अकाऊंटवरून तो त्या व्यक्तीच्या फ्रेंड लिस्टमधील मित्रांना मेसेंजरद्वारे पैशाची मागणी करू लागला आहे. 

Video : पुण्यातील धरणांबाबत महत्त्वाची बातमी

हा हॅकर संबंधित व्यक्तीचा अपघात झाल्याचे सांगून फोन पे आणि गुगल पेवर पैसे टाकण्याची मागणी करू लागला आहे. त्याच्या या मागणीला आज पुणे शहरातील दोघे बळी पडले आहेत. या दोघांची ६० हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. 

पुण्यातील `या` भागात अवैध व्यावसायिक जोमात

फसवणूक झालेल्यांमध्ये धनकवडी येथील गणेश चव्हाण आणि कोथरूड येथील संदीप पाटील यांचा समावेश आहे. या दोघांनीही आज सायंकाळी सायबर गुन्हे विभागाकडे ई-मेलद्वारे तक्रार दाखल केली आहे. 

शासनाच्या आदेशाचा विद्यार्थ्यांना फटका; गरवारे महाविद्यालयाचे २०० विद्यार्थी अकरावीत नापास

आज सकाळी अकरा वाजता पुणे शहरातील आत्माराम लायगुडे यांचे फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आले. त्यांच्या अकाऊंटच्या मेसेंजरद्वारे अनेकांना मेसेज पाठवून पैशाची मागणी करण्यात आली. या मागणीला सायंकाळी पाच वाजेपर्यंत दोन मित्र बळी पडले. या दोघांची ६० हजार रुपयांची फसवणूक झाली असल्याचे लायगुडे यांनी सांगितले.

पुण्यात हे काय चाललंय, रोज `एवढे` जण करताहेत आत्महत्या; ही आहेत कारणे...​​

ही अनोळखी व्यक्ती हिंदी भाषेत मेसेज पाठवत असून मुंबईतील असल्याचे सांगत आहे. संबंधित व्यक्तीचा अपघात झाला असून, ते आयसीयुमध्ये उपचार घेत असल्याचे सांगून, हे पैसे उकळले जात आहेत. 

गुगल किंवा फोन पेवरून पैसे टाकण्यास सांगितले जात आहे. यासाठी ८८७५९५९७५२ आणि ७४१९३०६०५७ हे मोबाईल नंबर दिले जात आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beware Punekars Facebook accounts are being hacked today