पुण्यात हे काय चाललंय, रोज `एवढे` जण करताहेत आत्महत्या; ही आहेत कारणे...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

-ससूनमधील पोस्टमार्टेमवरून स्पष्ट 
-कमावत्या वयोगटात आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक

पुणे : पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात गेल्या चौदा दिवसांमध्ये एक- दोन नव्हे तर तब्बल 28 जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केलीय. यामधील अकरा जण कमावत्या म्हणजे 31 ते 50 वर्षे वयोगटातील असल्याची धक्कादायक माहिती पुढे आलीय. 

Video : पुण्यातील धरणांबाबत महत्त्वाची बातमी

ससून रुग्णालयात 15 ते 29 मे या काळात आत्महत्या केलेल्यांचे मृतदेह पोस्टमार्टेमसाठी आल्यावर त्याच्या विश्‍लेषणातून हे स्पष्ट झालंय. गेल्या काही दिवसांपर्यंत सरासरी दर दिवशी एक गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या डेथबॉडी पोस्टमार्टेमसाठी येत असे. परंतु, सध्या हे प्रमाण दिवसाला दोन ते तीनपर्यंत वाढलंय. प्रेमभंग, नैराश्‍य, भविष्यातील संकटाची भीती अन्‌ घरातील भांडण या कारणांमुळे आत्महत्येसारखं भीषण पाऊल उचललं जातं आहे. 

पुण्यातील `या` भागात अवैध व्यावसायिक जोमात

देशाचं भविष्यच धोक्‍यात... 
आत्महत्या करणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे. 20 पेक्षा कमी वयाच्या तिघांनी आत्महत्या केली आहे. त्यात दोन मुली व एका मुलाचा समावेश आहे. 21 ते 30 वयोगटात आत्महत्येचे प्रमाण पाच आहे. त्यात चार पुरुष आणि एक महिला आहे. उत्पादनक्षम वयोगट असलेल्या 31 ते 50 मध्ये सर्वाधिक म्हणजे 11 जणांनी आत्महत्या केलीय. त्यातही आत्महत्या करणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण जास्त आहे. 51 ते 60 व 61 पेक्षा जास्त वय असणाऱ्या आठ जणांनी केली. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण सर्वाधिक 
वेगवेगळ्या कारणांनी आत्महत्या करणाऱ्यांमध्ये 79 टक्के (22) पुरुष आहेत. 11 ते 20 आणि 31 ते 50 वर्षे वयोगटातील प्रत्येकी दोन जणींनी गळफास घेतला. त्यामुळे महिलांचे प्रमाण 21 टक्के (6) इतके आहे. वयाची साठी ओलांडलेल्या सहा जणांनी आत्महत्या केली. त्यात सर्व पुरुष आहेत. 

पुणेकरांनो लॉकाडाउन वाढला; पण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन शक्य आहे!

सिंहगड रस्ता, कोथरूड परिसरात तर... 
ससून रुग्णालयात पोस्टमार्टेम झालेल्या 28 पैकी पाच मृतदेह जिल्ह्यातील होते. त्यात लोणीकंद येथील तीन, लोणी काळभोर आणि ग्रामीण भागातील प्रत्येकी एक मृतदेह होता. तर उर्वरित 23 आत्महत्यांच्या घटना शहरातील असून त्यात सिंहगड रस्त्यावर चार आणि कोथरूड, मुंढवा भागातील तिघांचा समावेश आहे. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा 

भाग आत्महत्यांच्या घटना 
मंगळवार पेठ, चंदननगर, लोणी काळभोर, वानवडी, सहकारनगर, स्वारगेट, पुणे ग्रामीण प्रत्येकी  1 
मार्केटयार्ड, कात्रज, दत्तवाडी, हडपसर  2
मुंढवा, लोणी कंद, कोथरूड  3 
सिंहगड रस्ता  4 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Every day two person commit suicide in Pune