भामा आसखेड धरण पूर्ण भरले

सकाळ वृत्तसेवा
Monday, 5 October 2020

पुणेकरांसह खेड, दौंड, शिरूर तालुक्याचे लक्ष लागलेल्या भामा आसखेड धरणात (ता. खेड) ९८.७३ टक्के (८.०४ टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी ४ ऑगस्टलाच धरण शंभर टक्के भरले होते. तसेच, धरणातून एकूण पाणीक्षमतेच्या जवळपास दीडपट पाणी नदीपात्रात सोडण्यात आले होते.

आंबेठाण - पुणेकरांसह खेड, दौंड, शिरूर तालुक्याचे लक्ष लागलेल्या भामा आसखेड धरणात (ता. खेड) ९८.७३ टक्के (८.०४ टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी ४ ऑगस्टलाच धरण शंभर टक्के भरले होते. तसेच, धरणातून एकूण पाणीक्षमतेच्या जवळपास दीडपट पाणी नदीपात्रात सोडण्यात आले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

खेड तालुक्यासह शिरूर आणि दौंड तालुक्याला वरदान ठरणाऱ्या भामा आसखेड धरणात आज (ता. ३) सकाळी सहा वाजेपर्यंत ९८.७३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा साठा कमी असून, मागील वर्षी आजच्या दिवशी धरण शंभर टक्के भरले होते.

धक्कादायक : नवरा- बायकोच्या भांडणात वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये ४ जणांचा बळी

या वर्षी धरण भरण्यास उशीर होत आहे. सुरवातीला धरण भरणार की नाही, याची नागरिकांना धास्ती वाटत होती. परंतु, हळूहळू पुरेसा पाऊस झाल्याने धरण भरण्याकडे वाटचाल करू लागले. या धरणाचा फायदा चाकण एमआयडीसीसह चाकण शहर आणि तालुक्याच्या दक्षिण पूर्व भागातील गावांसाठी होणार आहे. भविष्यात शेतीपेक्षा पिण्याच्या पाण्यासाठी धरणाचे पाणी मोठ्या प्रमाणात वापरले जाणार आहे. या धरणाच्या पाण्याचा फायदा खेडसह शिरूर व दौंड या तीन तालुक्यांना होत असतो.

हॉटेल, रेस्टॉरंट, बार उद्यापासून होणार सुरू; पुणेकरांनो, 'उत्साहासोबत जबाबदारीचेही भान ठेवा'

भामा आसखेड धरणाची पाणी साठवण क्षमता ८.१४ टीएमसी आहे. धरणात सध्या ८.०४ टीएमसी (९८.७३ टक्के) पाणीसाठा असून, जिवंत पाणीसाठा हा ७.५७ टीएमसी आहे. चालू वर्षी एक जूनपासून धरण क्षेत्रात ८८० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. काल दिवसभरात करंजविहिरे परिसरात ११ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती शाखा अभियंता बी. आर. खेडकर, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक के. डी. पांडे यांनी दिली आहे.

भामा आसखेड धरणाचा पाणीसाठा 

  • पाणी साठवणक्षमता ८.१४ टीएमसी
  • सध्याचा पाणीसाठा ८.०४
  • पाणीसाठ्याची टक्केवारी ९८.७३ 
  • एक जूनपासून धरण क्षेत्रात पाऊस ८८० मि.मी.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhama Aaskhed dam Water Full