हॉटेल, रेस्टॉरंट, बार उद्यापासून होणार सुरू; पुणेकरांनो, 'उत्साहासोबत जबाबदारीचेही भान ठेवा'

हॉटेल, रेस्टॉरंट, बार उद्यापासून होणार सुरू; पुणेकरांनो, 'उत्साहासोबत जबाबदारीचेही भान ठेवा'

पुणे ः तब्बल 192 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर खवय्यांच्या जिभेचे हौस आता पूर्ण होणार आहे. सोमवार (ता. 5) पासून राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास प्रशासनाच्या वतीने परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये तर समाधानाची भावना आहे. पण त्याचबरोबर खवय्यांमध्येही "जबाबदारी'चा उत्साह पहायला मिळत आहे. 

खूप दिवसांनंतर कुटुंबासोबत बाहेर आवडीचे पदार्थ खाण्याची संधी मिळणार असल्यामुळे, आनंद तर होतोय. परंतू, मनामध्ये थोडीशी भीती असल्याची भावना बाणेर येथील प्रवीण जगताप यांनी व्यक्त केली. ते म्हणाले,""कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर भीती जरी असली तरी उपहारगृहामध्ये योग्य खबरदारी घेणार असल्याचे माध्यमांतून कळत आहे. त्यामुळे नक्कीच जेवायला जाण्याचा आनंद आम्ही घेणार आहोत.'' तर दुसरीकडे हॉटेल चालक आणि मालकांनी कोरोनाच्या दृष्टीने घ्यावयाच्या खबरदारी संदर्भात पुणे रेस्टॉरंट ऍण्ड हॉटेलिअर्स असोसिएशनच्या वतीने मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. स्पर्श विरहित सेवा, कर्मचाऱ्यांनी घ्यावयाची काळजी, ग्राहकांसाठी गेटवर सॅनिटायझर, तापमानाची तपासणी आदी संदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

ग्राहकांची भावना ः 
- पत्नी सोबत किंवा कुटुंबासोबत जेवणासाठी बाहेर जाण्याची प्रचंड इच्छा 
- विशेषतः मांसाहारासाठी खवय्यांमध्ये उत्सुकता 
- विद्यार्थी किंवा अविवाहित नोकरदारांना जेवणाची सोय झाल्याचे समाधान 
- जिथे गर्दी कमी आणि नियमांच पालन होते, अशा उपाहारगृहात जाण्याला प्राधान्य 

रोज खाणावळीच खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे आठवड्यातून एकदातरी हॉटेलात आवडीचा पदार्थ खाण्यासाठी आम्ही जायचो. लॉकडाउनमध्ये हे सर्व बंद होते. आता मात्र करोनाच्या दृष्टीने योग्य खबरदारी घेऊन आम्ही नक्की जाणार आहोत. 
- अमृता पवार, विद्यार्थिनी 

खाण्यासाठी हॉटेलात जाणे आता चैन राहिली नाही. नोकरदारांसाठी ती एक गरज बनली आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे आम्हा सर्वांना दिलासा मिळाला आहे. निश्‍चितच आवश्‍यकतेनुसार मीत्रांसोबत आम्ही हॉटेलात जाणार आहे.-रामदास बडे, - नोकरदार. 

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com