वडगावशेरीतील पाणी टंचाईची समस्या लवकरच सुटणार...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 July 2020

भामा-आसखेड प्रकल्प लवकरच मार्गी लागणार...

विश्रांतवाडी (पुणे) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशामुळे भामा-आसखेड प्रकल्प लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती आमदार सुनिल टिंगरे यांनी दिली. नुकतीच त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत भामा-आसखेड प्रकल्पाची संपूर्ण पाहणी केली. या वेळी पुणे महानगरपालिकेचे अधिक्षक अभियंता प्रविण गेडाम, कार्यकारी अभियंता कड व भामा आसखेड प्रकल्पाचे अभियंते व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी  जलशुद्धीकरण केंद्र (WTP), कुरुळी BPT (ब्रेकींग प्रेशर टॅंक) टॅंकची व भामा आसखेड धरणाच्या जॅकवेल पंपहाऊसची पाहणी करण्यात आली.

‘कोरोना वॉरिअर्स, कोरोना योद्धा’ किंवा ‘कोरोना महायोद्धा’ प्रमाणपत्र...

केळगाव येथील १. १ कि.मी पाईपलाइनचे काम अनेक वर्षे बंद होते, आमदार सुनिल टिंगरे यांनी  दिनांक २९/०५/२०२० रोजी कौन्सिल हाॅल, पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भामा आसखेड प्रकल्पाचे काम सुरु करण्यासाठी विनंती केली होती. या अनुषंगाने दिनांक ०६/०६/२०२० उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीमध्ये भामा आसखेड धरणाच्या कालव्यासाठी आरक्षित केलेल्या जमिनींच्या सातबारा उतार्‍या वरील शेरे काढण्याचे आदेश खासदार डाॅ अमोल कोल्हे, आमदार सुनिल टिंगरे व आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत दिले होते.

स्फोटके शोधणे झाले सोपे !

या मुळे केळगावमधील १.१ कि.मीचे रखडलेले कामही वेगाने चालू आहे. "भामा आसखेडचे पाणी लवकरच वडगावशेरी मतदारसंघात येईल व गेले दहा वर्षे गंभीर असलेला पाणी टंचाईचा प्रश्न लवकरच उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रयत्नातून मार्गी लागेल" असे आमदार टिंगरे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Bhama-Askhed project will be launched soon