भक्तिरसात न्हाला भंडारा डोंगर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

गाथा पारायणाचा घोष...चरित्र कथेचा भाव...भजनाचा सूर...भारुडाचे प्रबोधन...कीर्तनाचे विश्‍लेषण...अन महाप्रसादाचा स्वाद...अशा विविध आविष्काराने अवघा भंडारा डोंगर भक्तिरसात न्हाऊन निघाला. निमित्त होते माघ शुद्ध दशमीच्या वारीचे. पुणे जिल्ह्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक संत तुकोबारायांच्या चरणी नतमस्तक झाले.

पिंपरी - गाथा पारायणाचा घोष...चरित्र कथेचा भाव...भजनाचा सूर...भारुडाचे प्रबोधन...कीर्तनाचे विश्‍लेषण...अन महाप्रसादाचा स्वाद...अशा विविध आविष्काराने अवघा भंडारा डोंगर भक्तिरसात न्हाऊन निघाला. निमित्त होते माघ शुद्ध दशमीच्या वारीचे. पुणे जिल्ह्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक संत तुकोबारायांच्या चरणी नतमस्तक झाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

श्री विठ्ठल रखुमाई संत तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने भंडारा डोंगरावर आयोजित माघ शुद्ध दशमी सोहळा परंपरेप्रमाणे सुरू आहे. त्याचा मुख्य दिवस असल्याने पहाटे संत तुकाराम महाराज मूर्तीची मंगलमय वातावरणात महापूजा झाली. त्यानंतर राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो भाविकांनी भंडारा डोंगरावर संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. ट्रस्टच्या वतीने भाविकांना दर्शनबारी करण्यात आली होती. मंदिरात आकर्षक सजावट केली होती. 

बेरोजगारांसाठी खुशखबर! पुण्यात मिळणार रोजगाराची संधी

सकाळपासूनच डोंगरावर भाविकांची रीघ लागली होती. गाथा पारायणानंतर दुपारी बारा वाजता ज्येष्ठ गायक रघुनाथ खंडाळकर, शुभम खंडाळकर, सुरंजन खंडाळकर यांच्या भजनानंदाचा कार्यक्रमात अवघे भक्तजन सुखावले. त्यांच्या सुराविष्कारात भाविक मंत्रमुग्ध झाले. त्यानंतर भारुडकार बालाजी महाराज शिरसाट यांचे भारूड सुरू झाले.

समाजातील अनिष्ठ प्रथा- परंपरांवर भारूडातून आसूड ओढले. त्यानंतर जंगले महाराज शास्त्री यांनी संत तुकाराम महाराजांची चरित्रकथा सांगितली. शांतिब्रह्म मारोती महाराज कुऱ्हेकर, आमदार सुनील शेळके, विदुरा नवले, दिगंबर भेगडे, विलास लांडे, विकास ढगे-पाटील, विजयराव जगताप, शंकरराव शेलार यांनी सप्ताहास भेट दिली. भाविकांनी सप्ताहात सहभागी व्हावे, असे अावाहन बाळासाहेब काशीद यांनी केले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhandara Dongar Dashami Sohala