

Unknown thieves vandalized two transformers, stealing copper coils and oil at Bharadi
Sakal
निरगुडसर : भराडी (ता.आंबेगाव) येथील घोडनदीच्या किनारी असलेल्या स्मशानभूमीजवळ दोन रोहित्र अज्ञात चोरट्यांनी मंगळवार (ता.०२) रोजी मध्यरात्री फोडली,यामध्ये महावितरण कंपनीचे १ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे,ही चोरीची घटना बुधवार (ता.०३) रोजी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. भराडी येथील घोडनदीकाठी स्मशानभूमी जवळ पाच ते सहा रोहित्र आहेत यातून काही कृषीपंप तर काही घरगुतीसाठी वीज पुरवठा केला जातो.याठिकाणी शेतकऱ्यांचे २५ ते ३० कृषीपंप असून त्यासाठी ३ ते ४ रोहित्र आहेत.